शेतातील यांत्रिकीकरण उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान होणार जमा ! वाचा संपूर्ण माहिती
शेतातील यांत्रिकीकरण उपकरणे
विविध कृषी यांत्रिकीकरण योजनांसाठी अर्ज केलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या दोन महिन्यांत सुमारे 200 कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कृषी आयुक्तालय युद्धपातळीवर नियोजन करत आहे.
केंद्र सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियान तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सध्या यंत्रसामग्री आणि उपकरणांसाठी अनुदान दिले जाते. याशिवाय राज्य सरकारेही यांत्रिकीकरणासाठी स्वतंत्र योजना राबवत आहेत.
सध्या कृषी विभागाकडून राज्यातील यांत्रिकीकरण अनुदानाचा दररोज आढावा घेतला जात आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये योग्य नियोजन केल्यास 31 मार्चअखेर राज्यभरात 200 कोटी रुपयांपर्यंतचा निधी वितरित होण्याची शक्यता आहे. याचा फायदा किमान 30,000 शेतकऱ्यांना होईल.
राज्य सरकारच्या लॉटरीत नामांकन झालेल्या शेतकऱ्यांनी विविध अवजारे व यंत्रे खरेदी केल्यानंतर हे अनुदान (Subsidy) दिले जाते. गेल्या तीन आठवड्यात 121 कोटी रुपये अनुदानासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी 101 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून 52 कोटी रुपये, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 42.84 कोटी रुपये आणि राज्य सरकारच्या यांत्रिकीकरण योजनेतून 27 कोटी रुपयांचा समावेश आहे.
हे पण वाचा : कोंबड्यांला होणारा रोगप्रसार कसा थांबवावा ? संपूर्ण माहिती
या वर्षी आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने यांत्रिकीकरण योजनांमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना 498 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी 421 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. कृषी विभागाच्या इतर योजनांच्या तुलनेत यावेळी यांत्रिकीकरणाच्या योजना वेगाने सुरू आहेत. लॉटरीत नाव असलेल्या लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान वाटप झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
राज्यातील कृषी यांत्रिकीकरण वाढणार
यांत्रिकीकरणासाठी देशात सर्वाधिक अनुदानाचे वितरण महाराष्ट्र राज्य करत आहे. यामुळे राज्यातील कृषी यंत्रसामग्री वाढणार असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. 2019 च्या सर्वेक्षणानुसार, राज्याची यांत्रिकी क्षमता 1.449 किलोवॅट प्रति हेक्टर होती. अजून नवीन सर्वेक्षण झालेले नाही. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पण 2024 च्या अखेरीस या रकमेत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
स्रोत : krushiyojana.com