कृषी महाराष्ट्र

सौर प्रकाश सापळा बसविण्यासाठी आता मिळते ७५ टक्के अनुदान !

सौर प्रकाश सापळा बसविण्यासाठी आता मिळते ७५ टक्के अनुदान !

सौर प्रकाश सापळा

किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये (Integrated Pest Management) विविध यांत्रिक, भौतिक, जैविक आणि रासायनिक पद्धतींचा अवलंब केला जातो.

यामध्ये सौर प्रकाश सापळ्यांचा (Light Trap) वापर फायदेशीर दिसून आला आहे. विशिष्ट कालावधीमध्ये विविध किडी सक्रिय असतात.

या किडींच्या नियंत्रणासाठी विविध सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो. सापळ्यात किडी पकडल्या गेल्याने त्यांचे जीवन चक्र खंडित होते, त्यामुळे प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविणे शक्य होते.

ही बाब लाक्षात घेऊन हरियाणा राज्य सरकारतर्फे (Haryana State Govt.) शेतात सौर प्रकाश सापळे बसवीण्यासाठी ७५ टक्के अनुदान दिले जात आहे.

हा सौर प्रकाश कीटक सापळा वापरण्यास सोपा आहे आणि विविध पिकांमध्ये वापरता येतो.

सौर प्रकाश सापळा कसा आहे ?

ट्रायपॉडवर एक भांडे, एक एलईडी बल्ब आणि सौर पॅनेल असते. ते सौर ऊर्जेच्या मदतीने आपोआप कार्य करते.

एलईडी बल्ब संध्याकाळी ६.३० ते ९.३० वाजेपर्यंत प्रकाश देतो. त्याचा निळा प्रकाश कीटकांना आकर्षित करतो.

दिवसा बॅटरी सौर पॅनेलद्वारे शोषलेल्या सूर्यप्रकाशाद्वारे चार्ज होते आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटरीद्वारे विद्युत उर्जेमध्ये रूपांतरित होते आणि बॅटरीमध्ये साठवले जाते.

रात्रीच्या वेळी, ही साठवलेली ऊर्जा सापळ्यात बसवलेल्या लाईटद्वारे वापरली जाते.

सापळ्यामध्ये विशेषत: ३०० ते ४२० नॅनोमीटरच्या स्पेक्ट्रमसह यूव्ही-ए प्रकाश देणारे लाइट वापरले जातात. ज्याकडे माश्या आकर्षित होतात आणि गोंद बोर्डला चिटकतात.

सौर कीटक सापळा पीक संरक्षणाचे एक महत्त्वाचे साधन आहे. विजेची समस्या असणाऱ्या भागात हा सापळा फायदेशीर आहे.

सापळ्यामध्ये वापरलेले घटक म्हणजे बॅटरी, सौर पॅनेल, चार्ज कंट्रोलर, यूव्ही लाइट, इलेक्ट्रिक जाळी, स्टँड इ. हे एक सौर-संचलित साधन आहे.

यामध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी आणि पकडण्यासाठी डिझाइन केलेले प्रकाश स्रोत आहे.

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top