कृषी महाराष्ट्र

थाई जातीच्या लिंबाची नांदेडमध्ये यशस्वी लागवड ! शेतकरी मित्राने घेतले लाखो रुपयांचे उत्पन्न

थाई जातीच्या लिंबाची नांदेडमध्ये यशस्वी लागवड ! शेतकरी मित्राने घेतले लाखो रुपयांचे उत्पन्न

 

नांदेड (nanded farmer) जिल्ह्यातील किनवट (kinwat News) तालुक्यातील दुर्गम भागातील पलाईगुडा इथल्या एका उच्च शिक्षित तरुणाने बारामाही येणाऱ्या थाई जातीच्या लिंबाच्या बागेची यशस्वी शेती केली आहे. केवळ शेणखताच्या बळावर थाई जातीच्या या लिंबोणीला फळांचा आता मोठा बहार आला आहे. उन्हाळा सुरू झाल्याने या लिंबाची बाजारात मागणी वाढली आहे. त्यातून अवघ्या दोन एकर क्षेत्रातील लिंबाच्या या बागेतून अडीच लाखांचे उत्पन्न होत असल्याचे या शेतकऱ्यांने सांगितल आहे. आकाराने मोठे असलेल्या या लिंबाला (lemon) हॉटेल आणि रसवंती चालकांची मोठी मागणी आहे. या लिंबाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची साल जाड असल्याने ते फ्रीज शिवाय बराच काळ टिकते. त्यामुळे थायलंडने विकसित केलेल्या या लिंबाला बाजारात मागणी वाढल्याचे उच्च शिक्षित असलेल्या अमोल आडे या शेतकऱ्याने या वाणाची निवड करत बाग फुलवली असल्यामुळे त्याची किनवट तालुक्यात सगळीकडे चर्चा सुरु आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यात पसरलेल्या वनक्षेत्रात सध्या मोहफुल वेचणीची भल्या पहाटेपासून लगबग दिसायला सुरुवात झाली आहे. पहाटे चार वाजल्यापासूनच या भागातील आदिवासी आणि बंजारा बांधव शेतात मोहफुल गोळा करत असतात. या मोहफुलांच्या वेचणीतून कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळत असल्याचे या मजुर सांगत आहेत. आता शेतीतील सगळी कामे आटोपल्याने या मोहफुलांच्या विक्रीतून शेकडो आदिवासी आणि बंजारा कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. त्यामुळे सध्या राम प्रहरी शेतात मजूर वर्ग मोह फुलांची वेचणी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसतय. या पिकलेल्या मोह फुलांचा वापर मद्य निर्मिती सोबतच अनेक औषधी बनवण्यात देखील होतो.

नंदुरबारच्या भाजीपाला बाजार समितीमध्ये कलर आणि नवीन प्रकारचे भाजीपाला येत आहे. कलरवाली फुलकोबी, कलरवाली गड्डा गोबी, फुलकोबी, कलरवाली दुधी अशा प्रकारच्या भाजीपाला विक्रीसाठी दाखल होत असून, ग्राहकांसाठी नवीन भाजीपाला मार्केटमध्ये आला असून या भाज्या मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहेत. कलर कोबी आणि दुधी पहिल्यांदाच नंदुरबार बाजारपेठेत दाखल झाले आहेत. कलरवाल्या भाजीपाला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात थंडीचा प्रमाण चांगलं असतं. त्यावेळेस याची लागवड केली जात असते, त्यामुळे मार्च, एप्रिलमध्ये या भाज्या मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होत असतात, कलर कोबीला ८० रुपयाच्या भाव मिळत आहे. तर दुधीला शंभर रुपयाच्या दर मिळत असून यामुळे विक्री देखील मोठ्या प्रमाणावर होत असून, भाजीपाला विक्रेत्यांना चांगलाच फायदा होत आहे.

source : tv9marathi

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top