Weather Update : पावसाची उघडीप राहणार : वाचा संपूर्ण
Weather Update
Rain Update News : पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव संपलेला असून पश्चिमेकडील भागावर हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिकचा हवेचा दाब राहण्यामुळे पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांना प्रतिबंध झाला आहे.
त्यामुळे पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव कमी होऊन पावसात उघडीत राहण्याची शक्यता आहे. यापुढील काळात कमाल व किमान तापमानात वाढ होत जाईल. प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णता जाणवेल. दुपारी वेळी उष्णतेचे प्रमाण अधिक राहील.
सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी होईल. बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत जाईल. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस, हिंदी महासागर व बंगालचे उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९.३० अंश सेल्सिअस तर प्रशांत महासागराचे पाण्याची पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे एल निनो तटस्थ स्थितीत राहील.
पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव मार्च महिन्याचे पहिल्या पंधरवड्यात जाणवतो. आजपर्यंत पंजाब, हरियाना, राजस्थान या भागात त्याचा प्रभाव अधिक असे.
मात्र, २०१४-२०१५ नंतर प्रथमच महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव जाणवला तसेच काही भागात गारपीटही झाली आहे. उत्तरेकडील पश्चिमेकडून येणाऱ्या अति थंड वाऱ्यांमुळे गारपीट होऊन नुकसानीचे प्रमाण वाढत आहे. हे सर्व हवामान बदलाच्या प्रभावामुळे होत आहे. Weather Update
१) कोकण :
कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ३२ अंश, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३१ अंश, तर रायगड जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी जिल्ह्यात २९ अंश, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत २१ अंश, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशत : ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८० ते ८४ टक्के, रायगड व पालघर जिल्ह्यांत ७० ते ७४ टक्के, तर ठाणे जिल्ह्यात ६७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ४० ते ४४ टक्के राहील.
रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ५ किमी इतका कमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
२) उत्तर महाराष्ट्र :
कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३२ अंश, धुळे व जळगाव जिल्ह्यात ३३ अंश, नंदूरबार जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात २० अंश, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत : ढगाळ राहील.
कमाल सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ५७ टक्के; तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ४४ ते ४७ टक्के राहील. किमान सापेक्ष आर्द्रता नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २१ ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ किमी व दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
३) मराठवाडा :
कमाल तापमान धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांत ३१ अंश, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३२ अंश, तर नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. या पुढे कमाल तापमान वाढत जाईल.
किमान तापमान धाराशिव, नांदेड व बीड जिल्ह्यांत १९ अंश, लातूर, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत : ढगाळ राहील. कमाल सापेक्ष आर्द्रता नांदेड जिल्ह्यात ७१ टक्के, तर उर्वरित धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ५६ ते ६७ टक्के राहील.
किमान सापेक्ष आर्द्रता परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २७ टक्के, तर उर्वरित धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० ते ३२ टक्के इतकी राहील.
धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १८ किमी राहील. उर्वरित जिल्ह्यात तो ४ ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून व नैर्ऋत्येकडून राहील.
४) पश्चिम विदर्भ :
कमाल तापमान अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३४ अंश, तर बुलडाणा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात १९ अंश, तर बुलडाणा जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशत : ढगाळ राहील. कमाल सापेक्ष आर्द्रता अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ६१ ते ६४ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यात ५६ टक्के राहील. किमान सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात २८ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील. Weather Update
५) मध्य विदर्भ :
कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३४ अंश, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत : ढगाळ राहील.
कमाल सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ६३ ते ७० टक्के, तर किमान सापेक्ष आर्द्रता २९ ते ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत आग्नेयेकडून, तर नागपूर जिल्ह्यात ईशान्येकडून राहील.
६) पूर्व विदर्भ :
कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात २९ अंश, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३१ अंश; तर चंद्रपूर जिल्ह्यात ५२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस; तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत १६ ते १७ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशत : ढगाळ राहील. कमाल सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ८१ टक्के; तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ७० ते ७६ टक्के राहील. किमान सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किमी व दिशा आग्नेयेकडून राहील.
७) दक्षिण पश्चिम महाराष्ट्र :
कमाल तापमान कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत ३१ अंश, तर सोलापूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा व पुणे जिल्ह्यांत १६ ते १७ अंश, सांगली जिल्ह्यात १८ अंश, सोलापूर व नगर जिल्ह्यांत १९ अंश आणि कोल्हापूर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशत : ढगाळ राहील.
कोल्हापूर जिल्ह्यात कमाल सापेक्ष आर्द्रता ८२ टक्के आणि उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ५८ ते ६७ टक्के इतकी राहील. किमान सापेक्ष आर्द्रता पुणे, सांगली व नगर जिल्ह्यांत २८ ते २९ टक्के, तर कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ३० ते ३१ टक्के राहील.
नगर व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १६ किमी; तर कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत ५ ते १३ किमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
कृषी सल्ला :
१) काढणीस आलेला गहू, ज्वारी, हरभरा पिकांची काढणी व मळणी करून घ्यावी.
२) काढणीस तयार आलेली भाजी व फळे काढून घ्यावीत.
३) नवीन लागवड केलेल्या फळांचे रोपांना काठीने आधार द्यावा.
४) जनावरांना रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.
source : agrowon