कृषी महाराष्ट्र

पोल्ट्री व्यवसाय करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर ही परवानगी आता अनिवार्य आहे

पोल्ट्री व्यवसाय करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर ही परवानगी आता अनिवार्य आहे

 

शेती व्यवसायात जर कधी नुकसान झाले तर कधी-कधी शेतीपूरक असलेला पोल्ट्री व्यवसाय आधार बनत असतो.

नाशिक : पोल्ट्री व्यवसाय म्हणजेच कुक्कुटपालन करत असतांना आता आणखी एक परवानगी घ्यावी लागणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळासह आता सरकारची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आली आहे. खरंतर यापूर्वी ग्रामीण भागात असणारा हा व्यवसायाला ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत स्तरावर ना हकरत दाखल मिळाला की व्यवसाय करण्यास परवानगी मिळत होती. मात्र, आता हरित लवादात दाखल करण्यात आलेल्या गौरी माउलीखी यांनी एक याचिका दाखल केली होती. त्यानुसार पाच हजार अधिक प्रकल्प असलेल्या प्रकल्पाला विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या सूनवटणीत हरित लवादाने याबाबत निकाल दिला आहे. त्यानुसार या व्यवसायासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळासह सरकारची परवानगी बंधनकारक असेल. याशिवाय पाच हजारांहून अधिक पक्षी असलेले व्यावसायिक या अधिकार कक्षेत ठेवण्यात आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत सविस्तर आदेश जारी केले असून नवीन वर्षात या आदेशाची अंमलबजावनी सुरू होणार आहे.

शेती व्यवसायाबरोबरच ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी कुक्कुटपालन करत असतात.

शेती व्यवसायात जर कधी नुकसान झाले तर कधी-कधी शेतीपूरक असलेला हा व्यवसाय आधार बनत असतो.

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पोल्ट्री व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. बर्ड फ्ल्यू आणि त्यानंतर आलेल्या कोरोनाने पोल्ट्री व्यवसाय करणारा शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे.

मात्र, हाच व्यवसाय करत असतांना आता पोल्ट्री व्यवसायकाला बंधने घालण्यात आली असून त्याचे पालन करावे लागणार आहे.

पाच हजारांपेक्षा अधिक पक्षी असलेल्या प्रकल्पाला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी बंधनकारक असेल.

याशिवाय कुक्कुटपालन प्रकल्प उभारताना लोकवस्तीपासून पाचशे मीटर लांब प्रकल्प असावा लागणार आहे. तसेच, नदी-नाल्यापासून दूर असावा.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय महामार्गापासून आणि मुख्य रस्त्यापासून शंभर मीटर हा प्रकल्प दूर यांसह विविध अटी ठेवण्यात आल्या आहे.

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top