कृषी महाराष्ट्र

पिकांवर “तेल फवारणी” : पद्धती, वैशिष्ट्ये व माहिती

पिकांवर “तेल फवारणी” : पद्धती, वैशिष्ट्ये व माहिती

“तेल फवारणी”

प्राचीन काळापासून विविध वनस्पती व प्राणीजन्य तेल त्यांच्या अत्युच्च गुणधर्मा नुसार विविध रोगांवर उपचारा करिता उपयोगात घेतले आहेत. कृषी क्षेत्रातील तेलांचा उपयोग किटक व बुरशीजन्य रोगांवर परिणामकारक उपाय म्हणून जगात केला जातो. त्यासंदर्भात आता आपण माहिती घेवुया.तेल वापरतांना घ्यावयाची काळजी- १. वातावरण/ॠतू (सीझन), किटक व बुरशींच्या प्रकारानुसार तेल कोणते वापरावे याबाबत मार्गदर्शन किंवा अभ्यासाची गरज आहे. नाहीतर आपल्याकडे कशावरही ‘मारा

निंम तेल’ हा प्रकार अतीशय मुर्ख पणाचा आहे.२. तेलांच्या फवारणीत पुर्ण झाडावरील फवारा आवश्यक आहे.

फवारणीचे तृषार बिंदू सुक्ष्म असावेत. थेंब नसावा.४.पावसाळ्यातील अती विलंब काळात तेल फवारणीस वापरू नये.५. गंधक (सल्फर) किंवा ताम्रयुक्त (कॉपर) बुरशीनाशकां सोबतचा वापर टाळावा.६.सरळ घाणीचे तेल (Dormant oil) हिवाळ्यात किंवा पालवी (नवती), बहार धरतांना वापरू नये.किटक व बुरशी विरूद्ध तेलांची कार्य पद्धती- (Mode of Action)

सर्वच तेलांची कार्यप्रणाली जवळपास सारखीच असते. यामध्ये कीटकनाशक म्हणून जेंव्हा वापर होतो. त्यावेळी तेल फवारणी मुळे होणाऱ्या गॅस उत्सर्जनामुळे किटकांची दमकोंडी होते.२. किटकांच्या शरिराची जळजळ होते व त्यांच्या शारीरिक बदलात (Metamorphosis) अडथळे निर्माण होतात. त्यामुळेच किटकांच्या उत्पत्तीवर असे होतो.३. किटकांच्या खान्यात तेलांचा अंश गेल्यावर उत्तम पोट विषाचा परिणाम दिसतो.४. रस शोषक किडींच्या ( पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे व कोळी) रस ग्रहन प्रक्रियेवर

असर करत असल्यामुळेच बर्‍याच विषाणू (व्हायरस) चे वहण करन्याची प्रक्रिया थांबते व रोगांचा प्रसार थांबतो.बुरशीवर जेंव्हा या तेलांचा वापर होतो तेंव्हा..

१. बुरशींचे कवकिय जाळे (Fungal filament) तेलां मधील तेलकट घटकामुळे तुटते. त्यामुळेच बुरशींची वाढ थांबते व तीचा नाश होतो.

२. बुरशीजन्य रोगांचा विस्तार (spred) बुरशींच्या बिजांपासून (Spores) हवा, प्राणी व किटकांच्या माध्यमां द्वारे वहन होवून होत असतो. परंतु, तेलांच्या फवारनी मुळे बुरशींचे बीज आहे त्या स्थितीत एकाच

ठिकाणी चिटकून बसतात आणि अपरिपक्व स्थितीतच त्यांचा नाश होतो. त्यामुळेच बुरशीजन्य रोगांच्या अती प्रादुर्भाव काळात तेलांची फवारणीच एकमेव पर्याय ठरतो.३. काही वनस्पती तेलात गंधकाचा (Sulphur) अंश असल्या कारणावरून त्यांचा बुरशीजन्य रोगांवर उत्तम रितीने परिणाम साधता येतो. उदा. करंज व नीम तेल. कोणत्या किटक व बुरशीजन्य रोगांवर परिणामकारक ठरेल ?किटनाशक म्हणून तेलांच्या फवारणीत मुलायम त्वचेच्या किडी उदा. कोळी(माइट्स), पांढरी माशी (व्हाइट फ्लाय), मावा, कोळी(माइट्स) फुलकिडे (थ्रीप्स), पांढरा ढेकूण (मीली बग) व स्केल याविरुद्ध

उत्तम स्पर्श आणि धुरीजन्य विष (कॉन्टॅक्ट आणि गॅस पॉइझन) म्हणून अतीशय परिणामकारक ठरतात.त्याशिवाय कुरतडून खाणारे अळीवर्गीय किटकांवर पोटविष (स्टमक पॉइझन) म्हणून वापर होतो. बुरशीजन्य रोगां मध्ये तेला द्वारे कोळशी (ब्लॅक सुटी मोल्ड), भुरी (पावडरी मील्ड्यू) व ठिपके पाडणारी बुरशी (spotted fungus for eg. Rust, Dahiya, Black spot) याविरुद्ध उत्तम परिणामकारकता दर्शवतात.अशा सर्व वापरानंतर सुद्धा रासायनिक औषधोपचारा नंतरचा ‘रेसीड्यू’ तेल फवारणीत दिसत नाही. करिता तेल फवारणीस अतीशय महत्त्वपूर्ण बाब समजून त्यांचा वापर करावा. “तेल फवारणी”

संकलन: पंकज काळे (M.Sc. Agri), निसर्ग फाऊंडेशन, अमरावती
संपर्क- 9403426096, 7350580311

 

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top