कृषी महाराष्ट्र

आता हार्वेस्टरनं करता येणार हरभऱ्याची काढणी

आता हार्वेस्टरनं करता येणार हरभऱ्याची काढणी

 

यंदा शेतकऱ्यांना हरभराऱ्याची काढणी करणं सोपं होणार आहे. कारण, जवाहरलाल नेहरु कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हरभऱ्याची एक विशेष जात विकसित केली आहे. ‘जवाहर चना 24’ असे या हरभऱ्याच्या नवीन जातीचं नाव आहे. या जातीच्या हरभऱ्याची हार्वेस्टरनं काढणी शक्य होणार आहे. त्यामुळं त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

हरभरा काढणी लगेच होणार

जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हरभऱ्याची एक विशेष जात विकसित केली आहे. जवाहर चना 24 असे हरभऱ्याच्या नवीन जातीचं नाव आहे. जी पोषणाच्या दृष्टीनं अधिक फायदेशीर ठरेल.

तसेच, ते शेतकऱ्यांसाठी मोठ्या उत्पन्नाचं साधन बनणार आहे. या नवीन जातीच्या हरभऱ्याची काढणी हार्वेस्टरनं शक्य होणार आहे. त्यामुळं जिथे हरभरा काढणीला अनेक दिवस लागायचे, तिथे आता काढणी लगेच होणार आहे.

महाराष्ट्रात लागवड करता येणार

या जातीचे धान्य सामान्य जातींपेक्षा मोठे, आकर्षक आणि तपकिरी रंगाचे असते. याच्या रोपाची देठ देखील जाड, मजबूत आणि जोरदार वारा सहनशील आहे. ही जात 110 ते 115 दिवसांत तयार होते. महाराष्ट्रात ही याची लागवड करता येणार आहे.

हरभरा हे एक प्रमुख कडधान्य पीक आहे. या पिकाची लागवड रब्बी हंगामात केली जाते. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि बिहारमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान हरभऱ्याची पेरणी केली जाते. यातून हरभऱ्याचे बंपर उत्पादन मिळते.

 

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top