मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु : अनुदानाच्या रकमेत वाढ
Agriculture Scheme : मागेल त्याला शेततळे योजना ही देखील एक शेतकरी हिताची आणि अतिशय महत्त्वाची योजना होती. कोरोना काळात महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत मोठा खळखळाट निर्माण झाल्याने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना बंद झाली होती.
ही योजना पुन्हा एकदा सुरु केली आहे. आता ही योजना ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना’ या नावे ही योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेतून राज्यात १३ हजार ५०० वैयक्तिक शेततळे येत्या वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात किंचित वाढ देखील केली गेली आहे. पूर्वी 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळत होते आता 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. शिवाय जिल्ह्याऐवजी आयुक्तालय स्तरावर शेततळ्यासाठी अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.
या योजनेतून राज्यात १३ हजार ५०० वैयक्तिक शेततळे येत्या वर्षभरात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1010 अनुसूचित जमातीसाठी 770 तसेच सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना 11,720 एवढी शेततळे अनुदानित करण्याचा शासनाचा मानस आहे. या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे.
– मागील योजनेसारखेच अनुदान या योजनेत मिळणार असले तरी अनुदान आयुक्त कार्यालय स्तरावरून थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल.
– लाभार्थ्यांना ‘महाडीबीटी’ पोर्टलवरूनच अर्ज करता येतील.
– लाभासाठी किमान साठ गुंठे जमीन आवश्यक आहे.
– यापूर्वी कोणत्याही योजनेतून शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा.
– लाभ देताना दिव्यांग व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य असेल.