यंदा गाळप हंगाम मार्चमध्येच होणार पूर्ण ? वाचा सविस्तर
पुणे- यंदा राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम (sugar Crushing Season) लवकर संपण्याची चिन्हे आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रातील २४ हून अधिक मोठ्या साखर कारखान्यांचा (sugar Factory) गाळप हंगाम प्रतिकूल हवामानामुळे थांबवला आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.
गाळप हंगाम लवकर संपल्यामुळे राज्यातील साखर उत्पादन घटण्याचीही चिन्हे आहेत.
सुरुवातीला १३८ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु त्यामध्ये आता घट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे देशातील एकूण साखर उत्पादन घटण्याचे चिन्हे आहेत.
भारताचे साखर उत्पादन घटले तर साखर निर्यातीवर मर्यादा येऊ शकतात. तसेच भावही वाढू शकतात.
तर साखर निर्यातीत प्रतिस्पर्धी असलेल्या ब्राझील आणि थायलंडसारख्या देशांना निर्यातीसाठी संधी निर्माण होऊ शकतात. Sugar Factory
देशाच्या साखर उत्पादनापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त वाटा महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील राज्यांचा आहे.
२०२२-२३ या पणन वर्षात १ ऑक्टोबरपासून पश्चिमेकडील राज्यांनी ९५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले.
मागील हंगामात याच काळात ते ९७ लाख ३ दशलक्ष टन होते, अशी माहितीही एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे.
सोलापूर विभागात १३ साखर कारखाने बंद झाले आहेत. पुढील दोन आठवड्यात २० कारखाने बंद होतील.
राज्यातील सर्व साखर कारखाने मार्चच्या अखेरीस बंद होतील, असेही अधिकाऱ्याने सांगितले आहे.
दरम्यान, २०२१-२२ मध्ये राज्यातील साखर कारखाने अतिरिक्त ऊस उत्पादनामुळे जूनच्या मध्यापर्यंत सुरू होते. यंदा मात्र मार्च अखेरच हंगाम संपण्याची शक्यता आहे.
source : agrowon