तूर लागवड तंत्रज्ञान आणि लागवडीसाठी पक्वता कालावधीनुसार वाण निवड
तूर लागवड तंत्रज्ञान
जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवड्या दरम्यान पेरणी पूर्ण करावी. उशिरा लागवड केल्यास पिकास लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात. तसेच फुले आणि शेंगांची संख्याही कमी राहते आणि उत्पादनात घट येते.
तुरीची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे खोल नांगरट करून वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. वखराची शेवटची पाळी देण्याआधी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. आधीच्या पिकांची धसकटे, काडी, कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खोलवर नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीस योग्य असते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ सामू असावा. तूर लागवड तंत्रज्ञान
सुधारित जाती
जाती | पीक कालावधी (दिवस) | उत्पादन (क्विं./हेक्टर) |
आय.सी.पी.एल-८७ | १२० ते १३० | १८ ते २० |
विपुला | १५० ते १७० | २४ ते २६ |
फुले राजेश्वरी | १४० ते १५० | २८ ते ३० |
बी.एस.एम.आर.-८५३ | १६० ते १७० | १८ ते २० |
बी.एस.एम.आर-७३६ | १७० ते १८० | १६ ते १८ |
बी. डी. एन.७११ | १५० ते १६० | १८ ते २० |
बी. डी.एन.७१६ | १६५ ते १७० | २० ते २२ |
पीक परिपक्व होण्यास लागणाऱ्या कालावधीनुसार वाणांचे वर्गीकरण :
१) अति लवकर परिपक्व होणारे : १३० दिवसांत आत.
२) लवकर परिपक्व होणारे : १३१ ते १५० दिवस
३) मध्यम लवकर तयार होणारे : १५१ ते १६५ दिवस
४) मध्यम कालावधीचे वाण : १६६ ते १८५ दिवस
५) उशिरा परिपक्व होणारे : १८६ दिवसांपेक्षा अधिक
जमीन आणि पर्जन्यमानानुसार वाणांची निवड
अ) मध्यम जमीन आणि मध्यम पर्जन्यमान असल्यास, लवकर किंवा मध्यम तयार होणाऱ्या वाणांची निवड करावी.
वाण : ए.के.टी. ८८११, आय.सी.पी.एल. ८७ (प्रगती), फुले राजेश्वरी, गोदावरी, रेणुका, फुले तृप्ती
ब) मध्यम ते भारी जमीन आणि खात्रीचे पर्जन्यमान असल्यास, मध्यम कालावधीचे वाण.
वाण : पी.के.व्ही. तारा, विपूला बी.एस.एम.आर. ७३६, बी.एस.एम.आर. ८५३, बी.डी.एन. ७०८, बी.डी.एन. ७१६, पी.डी.के.व्ही. आश्लेषा.
क) भारी जमीन तसेच खात्रीचे पर्जन्यमान असल्यास उशिरा तयार होणारे वाण.
वाण : आशा (आय.सी.पी.एल. ८७११९) किंवा पी.डी.के.व्ही. आश्लेषा.
पीक पद्धतीनुसार वाण निवड
अ) दुबार पीक
तूर पिकानंतर लगेच दुसरे पीक घ्यावयाचे असल्यास, लवकर तयार होणारे वाणाची निवड करावी. उदा. आय.सी.पी.एल. ८७ (प्रगती), ए.के.टी. ८८११.
ब) आंतरपीक
तूर पिकांत मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी इत्यादी पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करता येते. त्याकरिता मध्यम लवकर ते उशिरा तयार होणाऱ्या वाणांची निवड करावी. उदा. आशा, बी.एस.एम.आर. ८५३, पी.के.व्ही. तारा, फुले राजेश्वरी, पी.डी.के.व्ही. आश्लेषा.
लागवड तंत्र
आय.सी.पी.एल-८७ जातीच्या पेरणीसाठी हेक्टरी १८ ते २० किलो बियाणे लागते.
मध्यम कालावधीच्या राजेश्वरी, विपुला आणि बी.डी.एन-७११ या जातींचे हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे पुरसे आहे.
उशिरा येणाऱ्या आणि जास्त अंतरावरील जातींसाठी हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे टोकण पद्धतीने लावावे.
जमीन आणि हवामान
– मध्यम ते अति काळी पाण्याचा चांगला निचरा होणारी कसदार जमीन लागवडीस योग्य.
– जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ दरम्यान असावा.
– साधारण १८ ते २९ अंश सेल्सिअस तापमानात पिकाची वाढ चांगली होते. ३५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पीक सहन करू शकते.
– सुरवातीच्या दोन महिन्यात चांगला पाऊस व फुलोरा अवस्थेत तुरळक सरींमुळे उत्पादनात वाढ मिळते. Tur Cultivation
बीजप्रक्रिया
प्रति किलो बियाणांस ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम व पी.एस.बी. जिवाणू संवर्धन १० किलो बियाणांस गुळाच्या थंड द्रावणातून प्रक्रिया करावी.
जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा यादरम्यान पेरणी पूर्ण करावी. उशिरा लागवड केल्यास पिकास लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात. तसेच फुले आणि शेंगांची संख्याही कमी राहते आणि उत्पादनात घट येते.
लागवडीचे अंतर
आय.सी.पी.एल-८७ या लवकर तयार होणाऱ्या जातीची ४५ बाय १० सेंमी अंतरावर लागवड करावी.
मध्यम कालावधीतील जातीची ६० बाय २० सेंमी किंवा ९० बाय २० सेंमी अंतरावर लागवड करावी.
आंतरपीक पद्धती
कपाशीच्या ६ किंवा ८ ओळीनंतर एक ओळ तुरीची लागवड करावी. यासाठी ५ ते ६ महिने कालावधी असलेल्या बी.डी.एन-७१६, बी.एस.एम.आर-८५३, बी.एस.एम.आर-७३६ या जातींची लागवड करावी.
बाजरीमध्ये तुरीचे आंतरपीक घेता येते. यासाठी ४५ सेंमी अंतरावर बाजरीच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची या पध्दतीने पेरणी करावी.
मूग, उडीद किंवा चवळी यांसारख्या लवकर येणाऱ्या पिकांमध्ये मुगाच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची लागवड करावी. याप्रमाणे आंतरपीक घेतल्यास तुरीच्या जोमदार वाढीची सुरुवात होण्यापूर्वी मूग किंवा उडिदाचे पीक काढणीस येते.
खत व्यवस्थापन
पेरणीपूर्वी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे.
सलग तुरीसाठी पेरणीवेळी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद वेळी द्यावे.
आंतरपीक घेतल्यास ज्या पिकाच्या ओळी जास्त आहेत, त्या पिकाची शिफारशीत खत मात्रा द्यावी. उदा. सोयाबीन करिता ५० किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद अशी मात्रा द्यावी.
पाणी व्यवस्थापन
पीक वाढीच्या अवस्थेत (३०ते३५ दिवस), फुलोऱ्याच्या अवस्थेत (६० ते ७० दिवस) आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे किंवा अथवा ठिबक सिंचनाने ५० टक्के बाष्पीभवनानंतर पाणी द्यावे.
पिकांस फुले येण्याच्या अवस्थेत किंवा शेंगा लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास, २० ग्रॅम युरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेट किंवा डी.ए.पी. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आंतरमशागत पिकाच्या जोमदार वाढीसाठी पीक तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पहिली आणि त्यानंतर १५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वाफशावर करावी. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या कराव्यात.
पूर्वमशागत
– जमिनीची खोल नांगरणी करून उन्हात चांगली तापू द्यावी. आधीच्या पिकाचे अवशेष, पालापाचोळा गोळा करून जमीन स्वच्छ करावी.
– दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करवी. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी हेक्टरी १० ते १२ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रिय खत जमिनीत मिसळून घ्यावे.
हेक्टरी बियाणे व लागवड पद्धत
वाण—बियाणे (किलो प्रति हेक्टर)—दोन ओळीतील अंतर (सेंमी)—दोन झाडांतील अंतर (सेंमी)
अ) सलग लागवड
१) आय.सी.पी.एल. ८७—४० ते ४५—४५—२०
२) ए.के.टी. ८८११, विपूला, फुले राजेश्वरी, गोदावरी, फुले तृप्ती, बी.डी.एन.७१६—२५ ते ३०—६०—२०
३) पी.के.व्ही. तारा, बी.एस.एम.आर. ७३६, बी.एस.एम.आर. ८५३, विपुला, आशा, पी.डी.के.व्ही. आश्लेषा—१२ ते १५—९० ते १२०—२० ते ३०
४) आंतरपीक (मूग, उडीद, सोयाबीन इ. मध्ये तुरीचे वरीलपैकी मध्यम लवकर ते उशिरा तयार होणारे वाण घ्यावयाचे असल्यास)—५ ते ६—१८०—२० ते ३०
जमिनीच्या प्रतिवर दोन ओळींतील किंवा दोन झाडांतील अंतर अवलंबून असते. भारी व खोल जमीन असल्यास दोन ओळींतील आणि झाडांतील अंतर जास्त ठेवावे. मात्र, हलक्या जमिनीत अंतर कमी ठेवणे फायदेशीर ठरते. पेरणीस जसजसा उशीर होईल, तसे अंतर कमी करावे.
आंतरमशागत
– बियाणांची उगवण झाल्यानंतर साधारणपणे १० ते १५ दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एक किंवा दोन रोपे ठेवावीत.
– तुरीचे पीक पेरणीनंतर सुरवातीच्या काळात अतिशय सावकाश वाढते. त्यासाठी पेरणीनंतर ६० ते ९० दिवस किमान २ वेळा निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे.
– पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पहिली कोळपणी करावी. त्यानंतर २० ते २५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्या. तणनियंत्रणासाठी तणनाशकाचा वापरावयाचे असल्यास, (फवारणी : प्रति हेक्टर)
– पेरणीनंतर व उगवणीपुर्वी पेंडीमेथीलीन ७५० ग्रॅम.
– उगवणीनंतर इमॅझीथायपर (१० टक्के एसएल) ७५० मिलि प्रति. इमॅझीथायपर अधिक इमॅझोमॅाक्स (७० टक्के डब्ल्यूजी) १०० ग्रॅम.