कृषी महाराष्ट्र

पाच जिल्ह्यांत तूर काढणी व कापसाची वेचणी पुर्ण – वाचा संपूर्ण माहिती

पाच जिल्ह्यांत तूर काढणी व कापसाची वेचणी पुर्ण – वाचा संपूर्ण माहिती

पाच जिल्ह्यांत

Rabi Crop Harvesting लातूर : मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली नांदेड या पाचही जिल्ह्यांतील तूर पिकाची काढणी (Tur Harvesting) जवळपास पूर्ण झाली असून, कापसाची वेचणी (Cotton Picking) ही आटोपल्यात जमा आहे.

रब्बीची पीक पक्वता व काढणीच्या (Rabi Crop) अवस्थेत असताना उन्हाळी पेरणीची (Summer Sowing) मात्र अजून नोंद झाली नसल्याची स्थिती आहे. Cotton Picking

लातूर कृषी विभागातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर होते. त्या तुलनेत २७ लाख ६२ हजार ४८९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे १०० टक्के प्रत्यक्ष पेरणी झाली होती.

यामध्ये तुरीचे क्षेत्र २ लाख ५६ हजार ३०० हेक्टर, तर कापसाचे क्षेत्र चार लाख २ हजार ६८ हेक्टर इतके होते. विभागातील तुरीचे सरासरी ३ लाख ४९ हजार २५३ हेक्टर असलेल्या क्षेत्रापैकी आतापर्यंत २ लाख ५६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. Cotton Picking

त्याची टक्केवारी ७३ इतकी होती. या पिकाची सध्या काढणी सुरू असून, ९० ते ९५ टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.

लातूर विभागात कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ८५ हजार ०८८ हेक्टर असताना ४० हजार २०६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

त्याची टक्केवारी ८३ इतकी आहे. या कापूस पिकाच्या वेचणीची कामे अंतिम टप्प्यात असून ९० ते ९५ टक्के काढणी पूर्ण झालेली आहे

लातूर विभागातील रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर असताना १६ लाख ७९ हजार ३६१ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या १२३ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे.

रब्बीतील काही पिके वाढीच्या काही पक्वतेच्या व काही काढणीच्या अवस्थेत आहेत. दुसरीकडे उन्हाळी पिकांची मात्र पाचही जिल्ह्यांत कुठेही पेरणी झाल्याची नोंद नसल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top