कृषी महाराष्ट्र

Vegetable Market Price : टोमॅटो आणि मिरचीच्या दरात दुप्पटीने वाढ ! वाचा संपूर्ण

Vegetable Market Price : टोमॅटो आणि मिरचीच्या दरात दुप्पटीने वाढ ! वाचा संपूर्ण

Vegetable Market Price

Pune News : जून संपत आला तरी राज्यात मान्सूनचे आगमन न झाल्याने पाणी टंचाई भासू लागली आहे. अशातच तापमान वाढ आणि उष्णतेचा फटका पालेभाज्यांसह फळभाज्यांवर होत आहे. यामुळे भाज्यांचे दर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पिंपरी आणि पुण्यात किरकोळ विक्री होत असलेल्या टोमॅटो आणि मिरचीच्या दरात वाढ झाली आहे.

इतर भाज्यांच्या तुलनेत टोमॅटोचे भाव वाढले आहेत, मागच्या ८ दिवसांपूर्वी ३० रुपये किलोने विकला जाणार टोमॅटो ४० ते ४५ रुपये किलो दराने विकला जात आहे. तसेच कोथंबिर, पालक आणि मेथीच्या जुडीची तीस ते चाळीस रुपये दराने विक्री होत आहे. हिरव्या मिरचीचे दर प्रतिकिलो १०० वर गेले आहेत.

मागच्या काही महिन्यात टोमॅटोचा भाव पडल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा झाली होती. १० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. पाण्याअभावी पालेभाज्या आणि पीके वाळून जात असल्याने मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यातील २५ पैकी १८ धरणांनी तळ गाठल्याने उपसाबंदीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. पाण्याअभावी पालेभाज्यांची नासाडी होत आहे. यामुळे भाजीपाला आणि फळभाज्या बाजारात कमी प्रमाणात आल्याने दर वाढत आहेत. Market vegetable

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी उपबाजारात कांद्याची आवक ५३५ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे तर बटाट्याची ११९१ क्विंटल आल्याचे बाजारसमितीमार्फत माहिती देण्यात आली.

टोमॅटो ४०४ क्विंटल, मटार १४ क्विंटल एवढी आवक झाली आहे. मोशी उपबाजारात पालेभाज्या एकुण २६७०० पेंड्या, सफरचंद, मोसंबी, यासह अन्य फळे ३६० क्विंटल आणि फळभाज्यांची आवक ३४९६ क्विंटल एवढी झाली आहे.

पालेभांज्याच्या दरात किरकोळ वाढ

मेथी ३०, कोथिंबीर ४०, कांदापात २५, शेपु २५, पुदिना १५, मुळा २०, पालक ३०

फळभाज्यांचे प्रतिकिलोचे भाव

कांदा २०, बटाटा ३०, लसूण १००, आले १००, मटार ९०, भेंडी ६०, टोमॅटो ४० ते ४५, देशी आणि जवारी गवार १००, दोडका ४०, दुधी भोपळा ५०, लाल भोपळा ५० ते ६०, कारली ४०, वांगी ४०, भरीताची वांगी ५०, तोंडली ५०, पडवळ ४०, फ्लॉवर ५०, कोबी ३०, बिन्स १००, बीट ५०, आवळा ६०, राजमा ५०, काकडी ४०, शिमला ६०, शेवगा ९० असा दर आहे.

source : agrowon

Vegetable Market Price

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top