कृषी महाराष्ट्र

Weather forecast : विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज तर नाशिक जिल्ह्यात गारपिटीचा इशारा

Weather forecast : विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज तर नाशिक जिल्ह्यात गारपिटीचा इशारा

 

Weather forecast : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहे. आज (ता. ३०) नाशिक जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भात जोरदार वारे, विजा, मेधगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर केरळपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळील ईशान्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात ढगाळ हवामान असून, उकाड्यात वाढ झाली आहे.

आज (ता.३०) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपिट होण्याचा इशारा आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ कायम आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, विजांसह पावसाची शक्यता आहे. IMD Alert

पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान यामुळे उकाड्यात वाढ झाली असून, कमाल तापमानात मोठी घट झाली असून, किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर विदर्भातील महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १४.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. Weather forecast

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढतेय

दक्षिण अंदमान समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी ठळक झाले आहे. उद्यापर्यंत (ता. ३०) तीव्र कमी दाब क्षेत्रात (डिप्रेशन) रुपांतरण होणार आहे. तर वायव्येकडे सरकताना शनिवारपर्यंत (ता. २) उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २९.१ (१७.३), धुळे २५.० (१५.७), जळगाव २३.८(१८.८), कोल्हापूर – (२०.०), महाबळेश्वर २२.८ (१४.६), नाशिक २८.७ (१९.६), निफाड २७.२ (१८.२), सांगली २८.१ (१७.५), सातारा २८.१ (१७.५), सोलापूर ३३.०(२०.०), सांताक्रूझ ३१.३ (२१.०), डहाणू २९.३ (२०.५), रत्नागिरी ३२.८ (२२.३), छत्रपती संभाजीनगर २६.८ (२०.०), नांदेड २७.४ (२०.०), परभणी २५.९ (१९.५), अकोला २०.२ (१८.२), अमरावती १९.८ (१६.७), बुलढाणा २०.६ (१७.४), ब्रह्मपूरी २१.४ (१७.५), चंद्रपूर २३.०(१५.६), गडचिरोली २४.० (१६.०), गोंदिया १९.९ (१६.०), नागपूर १९.०(१७.७), वर्धा २०.२(१७.८), वाशीम २५.६(१६.२), यवतमाळ १८.५ (१७.०).

Weather forecast

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top