कृषी महाराष्ट्र

हवामान अंदाज : तापमानात वेगाने होणार वाढ !

हवामान अंदाज : तापमानात वेगाने होणार वाढ !

तापमानात वेगाने

तापमान वाढीमुळे (temperature) महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१० ते १०१२ हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. तापमानात वाढ होते, त्या वेळी हवेचे दाब कमी होतात. वाऱ्याच्या दिशेत बदल होत आहेत. (Weather Forecast)

ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, जळगाव, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, औरंगाबाद, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात झपाट्याने वाढ होईल.

अकोला जिल्ह्यात (Akoal District) कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. अशीच स्थिती कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. तापमानात वेगाने

सकाळी थंड तर दुपारी उष्ण हवामान जाणवेल. वाऱ्याचा वेग सामान्य राहण्यामुळे दुपारी उष्मा जाणवेल. बाष्पीभवनाचा वेग वाढेल. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी नोंदली जाईल. हे सर्व सूर्याचे उत्तरायण सुरू असल्याने होत आहे.

यापुढील काळात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत जाईल. दिवसाचा कालावधी वाढत जाईल, तर रात्रीचा कालावधी कमी होत जाईल. या आठवड्यात प्रखर सूर्यप्रकाश राहील. आकाश पूर्णत : निरभ्र राहील. Weather Update

कोकण :

कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७५ टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात ५० टक्के तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ५० टक्के राहील. रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २४ ते ३२ टक्के इतकी कमी राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६ टक्के तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत १० ते १४ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किमी राहील. वाऱ्याची दिशा रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ईशान्येकडून तर सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आग्येनेकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र :

कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअसपर्यंत, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल.

आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १७ ते २२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते ९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. दुपारच्या वेळी उष्णता जाणवेल. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी राहील. तापमानात वेगाने

वाऱ्याची दिशा धुळे जिल्ह्यात ईशान्येकडून आणि नाशिक, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत आग्येनेकडून राहील.

मराठवाडा :

कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. किमान तापमान औरंगाबाद जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, तर बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते ११ टक्के राहील. त्यामुळे दुपारी उष्णता व उष्मा जाणवेल.

वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा हिंगोली व जालना जिल्ह्यांत ईशान्येकडून, तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यांत आग्येनेकडून राहील. बाष्पीभवनाचा वेग वाढून पाण्याची गरज वाढेल.

पश्‍चिम विदर्भ :

कमाल तापमान अकोला जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल.
बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमानात वाढ होण्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल.

किमान तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २३ ते २५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १० टक्के इतकी कमी राहील. सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढेल. प्रखर सूर्यप्रकाशामुळे उष्णता वाढून पिकांना पाण्याचा ताण पडेल. Weather Update

मध्य विदर्भ :

कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ ते २७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १२ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील. हवामान अत्यंत कोरडे व उष्ण राहील.

पूर्व विदर्भ :

कमाल तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, तर गोंदिया जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ४० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा गडचिरोली जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र :

कमाल तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील.

कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ४३ टक्के, सांगली जिल्ह्यात ३० टक्के, तर सातारा, पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यांत १८ ते २३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील.

कृषी सल्ला :

– नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांना सावली करावी.
– जनावरांच्या शेडवर गवताचे आच्छादन करावे.
– नारळाचे झाडांना आठवड्याचे अंतराने ८० लिटर, तर आंबा झाडांना ४० लिटर पाणी द्यावे.
– हरभरा पिकावरील घाटे अळीचे नियंत्रण करावे.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top