Goat Rearing : उन्हाळ्यात शेळ्यांच्या व्यवस्थापनात कोणते बदल कराल ? वाचा संपूर्ण माहिती
Goat Rearing
Goat Farming: दिवसेंदिवस तापमानात वाढ होतेय. हवेतील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या तापमानात देखील वाढ होते. त्यामुळे जनावरांची पाणी आणि हिरव्या चाऱ्याची (Green Fodder) गरज वाढते. वाढत्या उन्हामुळे शेळ्यांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नाही. असला तरी योग्य प्रमाणात नसतो. त्यामुळे शेळ्यांना आवश्यक पोषणतत्त्वे मिळत नाहीत.
माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.
बहुतांश शेळीपालक शेळ्या दिवसभर बाहेर चरून आल्यानंतर रात्री शेडमध्ये बांधून ठेवतात. या पद्धतीमध्ये जो चारा उपलब्ध आहे तोच चारा शेळ्यांना मिळतो. त्यामुळे आवश्यक असणारे पौष्टिक घटक शेळ्यांना मिळतीलच हे सांगता येत नाही.
चांगला आहार न मिळाल्यामुळे शेळ्यांना पोषणतत्त्वांच्याअभावी बरेचसे आजार होतात. यामध्ये वजन कमी होणे, उष्माघात, मांस उत्पादन घटणे इत्यादी. या समस्या टाळण्यासाठी शेळ्यांच्या आहाराचे आणि आरोग्याचे योग्य व्यवस्थापन ठेवणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात शेळ्यांचा आहार कसा असावा आणि शेळ्यांची कशी काळजी घ्यावी याविषयीची माहिती पाहुया. Goat Rearing
शेळ्यांची कशी काळजी घ्यावी ?
– शेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते. त्यासाठी शेळ्यांना दररोज पाच किलो हिरवा चारा, एक किलो वाळलेल्या चारा द्यावा.
– मांसवाढीसाठी पूरक घटक चाऱ्यामधून मिळत नाहीत.त्यामुळे चाऱ्यामध्ये क्षार मिश्रण, प्रतिजैविके मिसळून द्यावीत.
– चाऱ्यासोबत विकरांचा वापर केल्यास चाऱ्याची पचनीयता वाढते. त्यामुळे शरीराला पौष्टिक घटक मिळून मांस उत्पादन वाढण्यास मदत होते. Goat Rearing
– प्रोबायोटिक्सच्या वापरामुळे ओटीपोटाला आवश्यक असणारे सूक्ष्म जीव मिळून पचनक्रिया जलद होते. यामुळे मांस उत्पादन वाढते तसेच शेळीची प्रकृती चांगली राहते.
– अाहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर केल्यास कमतरतेचे आजार कमी होऊन मांस उत्पादन वाढते. प्रतिजैविकाचा वापर केल्यास शेळीची रोगप्रतिकारक क्षमता वाढते व आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
– उन्हाळ्यात ११ ते ४ या काळात भरपूर ऊन असते. उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे शेळ्यांना सकाळी लवकर म्हणजे ६ ते ९ या वेळेस किंवा संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत चरण्यासाठी सोडावे.
– चरण्यासाठी विनाकारण जास्त अंतर शेळ्यांना चालवू नये. शक्यतो उन्हाळ्यात गोठ्यातच चारा खाऊ घालावा. उन्हाळ्यात चाऱ्यासाठी दूरवर भटकंतीमुळे गरजेप्रमाणे पोषणतत्त्वे न मिळाल्यामुळे शेळ्यांची प्रकृती खालावते.
– शेळ्यांना थंड, स्वच्छ पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावं. २४ तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.
– गोठ्यात पुरेशी जागा किंवा जास्त जागा उपलब्ध करून दिल्यास गोठ्यातील तापमानात वाढ होत नाही.
– उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्यांपासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो. त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती राहणे आवश्यक आहे.
– ज्या शेळ्यांचे केस लांब वाढलेले आहेत त्यांची उन्हाळ्यामध्ये कापणी करावी.
– शेळ्यांना आंत्रविषार, लाळ्या खुरकूत आणि घटसर्प रागाचे लसीकरण करुन घ्याव. लसीकरण करण्याच्या दोन दिवस आधी व नंतर इलेक्ट्रोलाइट पावडर, बी कॉम्प्लेक्स द्यावे. यामुळे शेळ्यांवर लसीकरणाचा ताण येणार नाही.
source : agrowon