कृषी महाराष्ट्र

Agriculture Schemes : शेतकऱ्यांसाठी 2023 मध्ये कोणत्या पाच योजना ठरल्या महत्त्वाच्या ? काय फायदे आहेत वाचा सविस्तर

Agriculture Schemes : शेतकऱ्यांसाठी 2023 मध्ये कोणत्या पाच योजना ठरल्या महत्त्वाच्या ? काय फायदे आहेत वाचा सविस्तर

 

Agriculture Schemes : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक उत्कृष्ट योजना राबवल्या जातात. जेणेकरून देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासोबतच त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल. आज आम्ही शेतकऱ्यांसाठी 2023 मध्ये सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाच्या 5 सरकारी योजनांची माहिती देणार आहे. ज्या 2023 मध्ये शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरल्या आहेत. या प्रमुख पाच सरकारी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि प्रधानमंत्री कृषी उडान योजना.

सरकारच्या या सर्व योजना शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या कामासाठी आर्थिक मदत करत आहेत. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांसाठीच्या या प्रमुख पाच सरकारी योजनांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

1)प्रधानमंत्री पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)- PMFBY योजनेअंतर्गत, नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे सरकारने अधिसूचित केलेल्या कोणत्याही पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत, विमा कंपन्या खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना २% प्रीमियम, रब्बी पिकांसाठी १.५% आणि व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी ५% प्रीमियम देतात.

2) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना/PM किसान योजना- PM किसान योजनेअंतर्गत, प्रत्येकी 2 हजार रुपयांचे तीन हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. अशाप्रकारे पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात.

3) किसान क्रेडिट कार्ड : Agriculture Schemes

किसान क्रेडिट कार्ड/KCC- किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी बँकांकडून परवडणाऱ्या व्याजदरावर कर्जाची सुविधा दिली जाते. KCC मधून, शेतकऱ्याला 3 लाख रुपयांच्या कर्जावर सुमारे चार टक्के वार्षिक व्याज भरावे लागते. Agriculture Schemes

4) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना/PMKSY- या योजनेंतर्गत, पाण्याची बचत करणाऱ्या उपकरणांवर सरकार अनुदान देते. यासाठी सरकार शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीसाठी प्रोत्साहन देत आहे. या प्रणालीचा वापर करून शेती केल्यास 40 ते 50 टक्के पाण्याची बचत तर होतेच शिवाय उत्पादनात 35 ते 40 टक्के वाढ होते.

5) प्रधानमंत्री कृषी उडान योजना

प्रधानमंत्री कृषी उडान योजना/प्रधानमंत्री किसान कृषी उडान योजना- या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कृषी उत्पादनांच्या वाहतुकीत मदत मिळते. जेणेकरून उत्पादन बाजारात पोहोचण्यापूर्वी खराब होऊ नये आणि शेतकऱ्यांची मेहनत व्यर्थ जाऊ नये. हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top