कृषी महाराष्ट्र

आंबा मोहोराची गळ का होते ? वाचा संपूर्ण माहिती

आंबा मोहोराची गळ का होते ? वाचा संपूर्ण माहिती

 

दरवर्षी कोणत्या न कोणत्या कारणान आंबा मोहोराच (Mango Bloom) पर्यायान पिकाच मोठ नुकसान होत. प्रमुख दुय्यम पोषण द्रव्यांची कमतरता, संजिवकांचा आभाव, पाण्याच अयोग्य व्यवस्थापन आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव यांसारख्या कारणांमुळ आंबा मोहोराची गळ होते.

आंब्याची उत्पादकता ही मोहोरावर अवलंबून आहे. त्यामुळे आंबा मोहोराचे संरक्षण करण गरजेच आहे. तापमानातील चढ-उतारामुळे आंबा मोहोराची गळ होते.

परागीकऱणावर परिणाम होतो त्यामुळे फळांच उत्पादन कमी मिळत. बदलत्या तापमानामुळे आंबा मोहोरावर काय परिणाम होतात याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाने दिलेली माहिती पाहुया.

आंब्याचा मोहोर सूक्ष्म अवस्थेत ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये तयार होतो. मोहोर बाहेर येण्यासाठी कमी तापमानाची म्हणजेच १५ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते.

तापमान १२.५ अंश सेल्सिअस पेक्षा कमी असेल तर अंब्याला नवीन पालवी येत नाही व मोहराच प्रमाण वाढत.

मोहोर बाहेर आल्यापासून बरेच दिवस तापमान कमी असेल तर नर फुलांच प्रमाण वाढत. संयुक्त फुलांच प्रमाण १३ टक्क्यांवरुन ३ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरत.

यामुळेच उशिरा आलेल्या मोहोरामध्ये तापमान वाढल्यान संयुक्त फुलांच प्रमाण जास्त आढळत. यामुळेच दक्षिण भारतातील आंब्यांमध्ये संयुक्त फुलांच प्रमाण कमी असत.

कारण दक्षीण भारतात आंब्याला नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये मोहोर येतो. तर उत्तर भारतामध्ये संयुक्त फुलांच प्रमाण जास्त आढळत.

कारण उत्तर भारतात मार्च ते जून महिन्यात मोहोर येतो. मोहोर आल्यानंतर तापमान कमी राहिल्यास फुलांचा आकार लहान राहतो. फुलांचा आकार लहान राहिल्यान बऱ्याच फुलांची गळ होते.

परागीकरणावरील परिणाम

सुरुवातीला लवकर आलेल्या मोहोराच फारच कमी म्हणजे १० टक्के परागीकरण होत. तर त्यानंतर आलेल्या फुलांच परागीकरण यापेक्षा जास्त व उशीरा आलेल्या फुलांच परागीकरण ४० ते ६० टक्के पर्यंत होत.

पराग कणांचा जीवंतपणा हा कमी तापमान असेल तर कमी व जास्त तापमान असेल तर जास्त असतो. आंब्यामध्ये परागीकरण मुख्यत: कीटकांद्वारे होत असत.

तापमान कमी असल्यास कीटकांची परागीकरण करण्याची क्षमता कमी राहते व परागीकरण कमी झाल्यान फलधारणा कमी होते.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top