जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी व्हर्मीवॉश कसं बनवायचं ?
जमिनीची सुपीकता (Soil Fertility) टिकून राहण्यासाठी गांडूळखत आवश्यक आहे हे सर्वांना माहितच आहे. गांडूळ खता इतकंच व्हर्मीवॉश पिकांसाठी उपयोगी आहे.
व्हर्मीवॉशला (Vermiwash) गांडूळ पाणी असेही म्हणतात.व्हर्मीवॉश पिकाच्या मुळांची वाढ होण्यासाठी तसच फळांची गळ थांबवण्यास मदत करते.
व्हॅर्मीवॉश घरच्या घरी बनवता येतं, ते कस बनवायच? याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठान दिलेली सविस्तर माहिती पाहुया.
व्हर्मिवॉश तयार करण्यासाठी २०० लिटर प्लास्टिक ड्रम वापरावा. प्लॅस्टिक ड्रमच्या तळापासून वर चार ते सहा इंच जागा सोडून व्हर्मीवॉश काढण्यासाठी तोटी बसवावी आणि
१) पहिला थर : ड्रमच्या खालच्या बाजूस विटांच्या तुकड्यांचा थर द्यावा.
२) दुसरा थर : विटांच्या तुकड्यावर वाळूचा थर द्यावा.
३) तिसरा थर : २५ टक्के माती आणि ७५ टक्के कुजलेल्या शेणखताचा थर द्यावा.
४) चौथा थर : शेणखताच्या थरावर दोन किलो गांडुळे सोडावीत.
५) पाचवा थर : गांडूळे सोडल्यानंतर त्यावर मातीमिश्रित शेणखत/ कुजलेले शेणखत याचा थर द्यावा.त्यानंतर यावर एका पाइपद्वारे ड्रिपरच्या साह्याने थेंब-थेंब पाणी पडण्याची व्यवस्था करावी. (Vermiwash Making)
प्रत्येक थरामध्ये एका प्लॅस्टिक जाळीचा वापर करावा. जेणेकरून गांडुळे खालच्या थरात जाणार नाहीत.
पहिल्या पंधरा दिवसांत जमा झालेले व्हर्मीवॉश पुन्हा ड्रममध्ये टाकावे. त्यानंतर पुढे तयार होणारे व्हर्मीवॉश स्वतंत्र बादलीत जमा करावे.
ड्रम सावलीत ठेवावा.ड्रममध्ये पुरेसा ओलावा ठेवण्यासाठी वरच्या थरावर कोकोपीटचा वापर करावा. (Vermiwash Making)
व्हर्मिवॉशचे फायदे काय आहेत ?
फवारणीसाठी व्हर्मिवॉश आणि पाणी यांचे प्रमाण १ : १० असे ठेवावे. हे पीक वर्धक म्हणून काम करते.
यामध्ये संप्रेरक, जीवनसत्त्वे, प्रथिने, विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. यामुळे मुळांची वाढ जोमदार होते.
फुलोरा आणि फळ पक्व अवस्थेत फवारणीद्वारे वापरल्याने फूलगळ, फळांची गळ थांबवण्यास मदत होते.
गांडूळ खत आणि व्हर्मीवॉश
- व्हर्मीवॉशच्या दोन फवारण्यामधील अतर १० ते १५ दिवसांचे असावे.
- हंगामी पिकासाठी ३ ते ४ फवारण्या तर
- वार्षिक पिकासाठी ५ ते ६ फवारण्या कराव्यात
व्हमीवोशच्या फवारणीचे कोणतेही दुष्परिणाम होत नराल्यामूळे त्याचा वापर वरचेवर करावा
source : agrowon.com