Cotton Market : कापूस भावातील सुधारणा कायम राहील का ? कापूस ऑगस्टमध्ये किती वाढेल ? वाचा सविस्तर
Cotton Market : कापूस बाजारातून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आली. आता बहुतेक शेतकऱ्यांनी कापूस विकला. अगदी बोटावर मोजण्याऐवढ्या शेतकऱ्यांकडे कापूस आहे. आज देशातील बाजारात कापूस दरात ३०० ते ५०० रुपयांची सुधारणा दिसून आली. ऑगस्ट महिन्यात कापूस दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे जाणकारांनी सांगितले.
कापूस भावात सुधारणा होण्याचे संकेत मागील आठवड्यापासूनच मिळत होते. अमेरिकेतील महत्वाच्या कापूस उत्पादक भागांमध्ये उष्णतेचा फटका बसत आहे. त्यातच चीनकडून कापसाला मागणी वाढल्याचे सांगितले जाते. चीन स्टाॅकमधील कापूस विकत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सुधारणा झाली. अमेरिकेच्या इंटरकाॅन्टीनेंटल एक्सचेंजवर कापूस दरात आज दुपारपर्यंत एक टक्क्याची वाढ झाली होती. कापूस वायदे ८५.१८ सेंट प्रतिपाउंडवर होते.
देशातील वायद्यांमध्येही आज सुधारणा झाली होती. कापूस वायद्यांमध्ये आज २०० रुपयांनी वाढून ६० हजारांच्या पुढे गेले होते. कापूस वायद्यांमध्ये मागील आठवड्यापासू चढ उतार दिसत होते. आज नोव्हेंबरचे वायदे ६० हजार ४८० रुपयांवर होते. नोव्हेंबरच्या वायद्यांमध्ये आज चांगली वाढ झाली होती. Cotton Market
देशात सणांच्या पार्श्वभुमीवर कापसाला मागणी वाढत आहे. सणांमध्ये कापडाला उठाव मिळत असतो. कापडांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढल्याचं उद्योगांकडून सांगण्यात आलं. सुताला सध्या चांगली मागणी येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सुताला उठाव असल्यानं कापसाला उठावही वाढला. यामुळे कापूस भावात सुधारणा दिसून येत आहे.
आज कापसाच्या भावात क्विंटलमागं ३०० ते ५०० रुपयांची सुधारणा झाली होती. त्यामुळे देशातील बाजारात कापसाला गुणवत्तेप्रमाणे ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. तसचं देशातील बाजारांमध्ये भावही वेगवेगळा दिसून येत आहे. कापसाचा कमाल भाव काही बाजारांमध्ये ७ हजार ५०० रुपयांवर पोचलेला होता.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील बाजारात सरासरी १८ हजार गाठींच्या दरम्यान आवक झाली. ही आवक खूपच जास्त आहे. एरव्ही ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कापूस आवक ४ हजार गाठींच्या दरम्यान राहते. पण दुसरीकडे कापसाला उठाव असल्याने भाव वाढताना दिसत आहे. Cotton Market
कापसाच्या भावात पुढील काळात काहीसे चढ उतार दिसू शकतात. पण दरातील वाढ जास्त कमी होणार नाही. अमेरिकेतील कापूस पिकाची स्थिती आणि चीनमधील कापसाची, याचा बाजाराला आधार आहे. तर देशातही साणांमुळे मागणी वाढत आहे. यामुळे कापूस दरात चालू महिन्यात किमान ५०० रुपयांची सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
source : agrowon