कृषी महाराष्ट्र

राज्यात ३ दिवस यलो अलर्ट ! हवामान खात्याकडून कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा ? वाचा संपूर्ण

राज्यात ३ दिवस यलो अलर्ट ! हवामान खात्याकडून कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा ? वाचा संपूर्ण

 

Weather Forecast राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे हवामानात वारंवार बदल होताना दिसत आहेत. अशात आता हवामान खात्याकडून पुढच्या ३ दिवसांसाठी महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ३ दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आज (४ एप्रिल, मंगळवार) विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या (५ एप्रिल) गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. (Havaman Andaj)

कधी आणि कुठे होणार अवकाळी पाऊस…

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर इथं ६ एप्रिल (गुरुवार) रोजी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

६ एप्रिलला मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ एप्रिल रोजी विदर्भातील अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर ७ एप्रिलला (शुक्रवार) पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणं गरजेचं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या काही भागांत तुरळक ठिकाणी ५ एप्रिल २०२३ पासून पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील ५ दिवस तीव्र हवामानाचा अंदाज अपेक्षित आहे अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडून देण्यात आली आहे.

पश्चिम आणि आग्नेय वाऱ्यांमुळे हवामानात बदल…

महाराष्ट्रात पुढील ३-४ दिवस पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पश्चिम आणि दक्षिण-पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचं मिलन झाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या कोनीय स्थितीमुळे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यापासून तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून या भागात दमट वारे निर्माण झाले आहेत.

तापमानात अचानक वाढ झाल्याने पावसाचा अंदाज…

दरम्यान, तापमानातही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळ अनेक ठिकाणी सरासरी तापमान ३५ अंश सेल्सिअस असल्याचं पाहायला मिळालं. हे वाढलेले तापमानही अवकाळी पावसासाठी मोठं कारण असणार आहे. इतकंच नाहीतर पुढील तीन-चार दिवस महाराष्ट्रातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

source : maharashtratimes

Yellow alert for 3 days in the state For Heavy Rain

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top