कृषी महाराष्ट्र

विद्राव्य खते फवारणीद्वारे कशी वापरायची ? वाचा सविस्तर

विद्राव्य खते फवारणीद्वारे कशी वापरायची ? वाचा सविस्तर

विद्राव्य खते फवारणीद्वारे

अलीकडे बहुतांश शेतकरी ठिबक (Drip Irrigation) आणि अन्य सूक्ष्म सिंचन (Micro irrigation) पद्धतीचा वापर करू लागली आहेत. सुक्ष्मसिंचनातून आवश्यक अन्नद्रव्ये पुरविण्यासाठी पाण्यात संपूर्ण विरघळणाऱ्या खतांचा (Soluble Fertilizers) वापर केला जातो.

अशा पाण्यात विरघळणाऱ्या अन्नद्रव्यांना विद्राव्य खते म्हणतात. त्यांच्या वापर ठिबक सिंचनासोबत फवारणीद्वारेही करता येतो.

विद्राव्य खते प्रामुख्याने फवारणीद्वारे दिल्याने जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. ही खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यायची असतात. सध्या बाजारामध्ये प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली खते उपलब्ध आहे‏त.

फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्यायी होऊ शकत नाहीत. मात्र फवारणीतील खते अचानक निर्माण झालेल्या पानांतील अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढतात.

या विद्राव्य खतांचा फावरणीद्वारे वापर कसा करायचा आणि फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

विद्राव्य खताचा फवारणीद्वारे वापर करताना…

पिकांची पाने अन्नद्रव्यांचे शोषण करू शकतात. परंतु या पद्धतीने अन्नद्रव्यांचे शोषण फारच कमी प्रमाणात केले जाते. फवारणीद्वारे अन्नद्रव्ये देताना द्रावणातील अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असावे. अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे वापर करताना पिकांवर नियमित व वारंवार फवारणी केली पाहिजे.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे वापर फळवर्गीय पिकांना जास्त उपयुक्त आहे. fertilizers

सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे देताना द्रावणाचा सामू आम्ल किंवा अल्कधर्मीय असू नये. त्यासाठी द्रावणात चुना योग्य त्या प्रमाणात वापरणे आवश्यक आहे. ज्यामुळे द्रावणाचा सामू अल्क किंवा आम्लधर्मी होत नाही.

फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरासाठी द्रावणाची तीव्रता पिकांच्या गरजेनुसार असावी. ज्या पिकांच्या पानावर मेणयुक्त थर असतो त्या पिकांवर फवारणी करताना द्रावणात स्टीकर मिसळावा. fertilizers

फवारणी करताना काय काळजी घ्यावी ?

द्रावणाची तीव्रता कमी ठेवून जास्त फवारण्या कराव्यात, परंतु जास्त तीव्रतेचे द्रावण कधीही करू नये.

फवारणीच्या वेळेस थेंबाचे आकारमान अत्यंत कमी असावे. म्हणजे थेंब पानांवर किंवा झाडावर पडताच चिटकला पाहिजे. थेंब मोठा असल्यास तो ओघळून जमिनीवर पडतो.

फवारणी केल्यानंतर द्रावणाचा थेंब पानावर चिकटत नसेल तर स्टीकरचा वापर करावा.

अशाप्रकारे विद्राव्य खताचा वापर केल्यास खताची नासाडी होत नाही. पीक फुलो­ऱ्यात येण्याचा काळ, फळधारणा झाल्यानंतर तसेच बिया, फळांची वाढ होण्याकरिता जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागतात अशा वेळेस फवारणीद्वारे दिलेली खते खूप उपयोगी पडतात. त्यामुळे विद्राव्य खताचा वापर फवारणीद्वारे करताना येतो.

source : agrowon

FAQ : How to use soluble fertilizers by spraying

[sc_fs_multi_faq headline-0=”h2″ question-0=”खते कशी वापरली जातात?” answer-0=”लागवड करताना. लागवडीदरम्यान, बियाण्यांच्या पंक्तीजवळील मातीच्या पृष्ठभागाच्या खाली खत टाकले जाते. बहुतेकदा, खत बियाण्याच्या पंक्तीच्या 1 ते 2 इंच खाली (किंवा खाली आणि बाजूला) ठेवले जाते. थंड, ओल्या भागात, रोपांच्या वाढीस चालना देण्यासाठी खताचा “स्टार्टर ऍप्लिकेशन” सबसर्फेस बँडमध्ये ठेवला जातो.” image-0=”” headline-1=”h2″ question-1=” विद्राव्य खत कसे मिसळावे?” answer-1=”पाण्यात विरघळणारे खत मिसळताना, टाकीमध्ये आवश्यक असलेल्या एकूण व्हॉल्यूमच्या ½ पेक्षा कमी ठेवा, नंतर खत घाला, नंतर मिसळा आणि पाणी घाला जेणेकरून साठ्याचे एकूण प्रमाण आवश्यक पातळीपर्यंत वाढेल.” image-1=”” headline-2=”h2″ question-2=”तुम्ही मल्टीफीड कसे वापरता?” answer-2=”मल्टीफीडचा वापर पिकांना कमी ते मध्यम पोषक तत्वांची आवश्यकता असलेल्या सर्व आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी किंवा जेव्हा मातीमध्ये पोषक तत्वांची जास्त मागणी असते तेव्हा ते पूरक म्हणून वापरले जाऊ शकते. Dilute at 1 part product with 30 parts water and mix thoroughly .” image-2=”” headline-3=”h2″ question-3=”पाण्यात विरघळणारी खते कशी वापरायची?” answer-3=”पाण्यात विरघळणारी खते ही अशी खते आहेत जी पाण्यात विरघळली जाऊ शकतात आणि ठिबक सिंचन आणि पर्णासंबंधी वापराद्वारे पोषक तत्वांच्या वापराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी थेट झाडाला लावली जातात .” image-3=”” headline-4=”h2″ question-4=”Nutrex खत कशासाठी वापरले जाते?” answer-4=”न्यूट्रेक्स हे पूर्णपणे विरघळणारे खत आहे ज्यामध्ये मुख्य पौष्टिक घटकांसह संतुलित सूत्र आहे, दुय्यम पोषक तत्वांद्वारे पूरक आहे. हे पर्णसंभार, तसेच वनस्पतींच्या मुळांवर लागू करण्याची शिफारस केली जाते. जेव्हा अधिक सामान्य सूत्रीकरण आवश्यक असेल तेव्हा त्याचे संतुलित सूत्र वापरले जाऊ शकते.” image-4=”” count=”5″ html=”true” css_class=”” विद्राव्य खते फवारणीद्वारे]

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top