फुलशेतीतून चांगलं उत्पन्न मिळतं ! नियोजन कसं करावं ? वाचा संपूर्ण माहिती
फुलशेतीतून चांगलं उत्पन्न
शेतकरी : विठ्ठल गेनबा झेंडे
गाव : दिवे, ता. पुरंदर, जि. पुणे
एकूण क्षेत्र : ११ एकर
फुलशेती : २० गुंठे (पॉलिहाउस)
कार्नेशन, जरबेरा लागवड : प्रत्येकी १० गुंठे
Flower farming planning : पुणे जिल्ह्यातील दिवे आणि जाधववाडी (ता. पुरंदर) येथे विठ्ठल गेनबा झेंडे यांची ११ एकर शेती आहे. त्यांचे पाच भावंडांचे कुटुंब असून त्यातील विठ्ठल आणि संतोष गेनबा झेंडे हे दोघे भाऊ शेती करतात.
शेतीमध्ये प्रामुख्याने सीताफळ ५ एकर, अंजीर २ एकर (Fig), पेरू २ एकरावर लागवड (Peru Cultivation) आहे. २०१४ मध्ये त्यांनी २ गुंठे क्षेत्रावर पॉलिहाउस (Polyhouse) उभारणी केली आहे. सुरुवातीला कार्नेशन आणि रंगीत ढोबळी मिरची प्रत्येकी १ गुंठे क्षेत्रावर लागवड केली होती. Flower Farming Planning
बाजारात फुलांना चांगले दर मिळत असल्याने त्यांनी कार्नेशन आणि जरबेरा लागवडीचा निर्णय घेतला. त्यामुळे उत्पन्न वाढीस मदत होत असल्याचे विठ्ठलराव सांगतात.
पुन्हा जून २०२१ मध्ये १ गुंठ्यामध्ये जरबेरा, तर १ गुंठ्यावर नोव्हेंबर २०२२ मध्ये कार्नेशन लागवड केलेली आहे. ही दोन्ही फुलपिके एकदा लागवड केल्यानंतर त्यापासून साधारण ३ ते ५ वर्षांपर्यंत उत्पादन मिळते.
लागवड नियोजन
पॉलिहाउसमध्ये फुलांच्या लागवडीसाठी प्रथम २०० ब्रास लाल माती प्रति गुंठा प्रमाणे टाकून घेतली. त्यानंतर दीड फूट रुंद आणि २६ फूट लांबीचे बेड तयार केले.
शेणखत, गांडूळ खत, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. फुलशेतीतून चांगलं उत्पन्न
लागवडीसाठी रोपवाटिकेतून रोपांची आगाऊ मागणी नोंदविली होती. त्यानुसार कार्नेशन १०.५० रुपये, तर जरबेरा ३२.५० रुपये प्रति रोप दराने खरेदी केली.
प्रत्येकी १ गुंठे क्षेत्रावर लागवडीसाठी कार्नेशनची सुमारे २० हजार, तर जरबेराची साडेसहा हजार रोपे लागली.
लागवडीनंतर सुरवातीचे २१ दिवस रोपांची विशेष काळजी घेतली. सुरुवातीच्या काळात पांढरी मुळी वाढीसाठी १९ः१९ः१९, ह्युमिक ॲसिड आणि बुरशीनाशकांची आळवणी केली.
२१ दिवसांनंतर ड्रीपद्वारे १९ः१९ः१९, ०ः५२ः३४, १२ः६१ः०, १३ः४०ः१३ यांची मात्रा देण्यास सुरुवात केली. जेणेकरून सेटिंग चांगली होईल.
सिंचन व्यवस्थापन
कार्नेशन आणि जरबेरा या दोन्ही फुलपिकांस जास्त पाण्याची आवश्यकता भासत नाही. पिकांस पाणी आणि अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन केल्यास अधिक काळ उत्पादन मिळण्यास मदत होते. दररोज फक्त १० मिनिटे ठिबक संच चालू केला जातो.
पिकांस प्रमाणशीर पाण्याचा पुरवठा होईल याची काळजी घेतली जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत सिंचनाचा कालावधी कमी जास्त केला जातो.
कीड-रोग नियंत्रण
मोकळ्या वातावरणाच्या तुलनेत पॉलिहाउसमधील फूल लागवडीत रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. जरबेरा आणि कार्नेशन या फूल पिकांवर काही ठराविक कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यात लाल मावा, तुडतुडे, नागअळी, करपा यांचा समावेश होतो.
पिकाचे कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी सातत्याने निरीक्षण केले जाते. आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाते. वातावरण बदलानुसार कमी-जास्त फवारण्या घेतल्या जातात. Flower Farming Planning
उत्पादन
जरबेरा आणि कार्नेशन या दोन्ही फुलपिकाचे वर्षभर उत्पादन मिळते. उत्पादन सुरू झाल्यानंतर दिवसाआड फुलांची काढणी करावी लागते. काढलेल्या फुलांची दर्जेदार पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविली जातात. दोन्ही प्रकारच्या फुलांना लग्नसराईच्या काळात चांगली मागणी असते. त्यामुळे दरही चांगले मिळतात.
जरबेरा फुलांची १ गड्डी साधारणपणे १० फुलांची असते. दहा गुंठे क्षेत्रातून दिवसाआड साधारण १५० ते १६० गड्ड्या फुलांचे उत्पादन मिळते.
बाजारात प्रति गड्डी साधारण ६० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळतो. हंगामात हा दर १०० रुपयांपर्यंत देखील जातो.
कार्नेशन फुलांची एक गड्डी २० फुलांची असते. एक दिवसाआड ८० ते १०० गड्डी फुलांचे उत्पादन मिळते. एका गड्डीला १५० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळतो.
काढणी
एक दिवसाआड फुलांची काढणी केली जाते. जरबेरा फुले काढणीस एकदम सोपी असून, कमी वेळात काढणी पूर्ण होते. तर कार्नेशन फुले काढण्यासाठी कात्री वापरावी लागते. त्यामुळे त्याला जास्त वेळ लागतो.
मागील कामकाज
पॉलिहाउसमधील खराब आणि रोगग्रस्त पाने काढून घेतली.
जमिनीवर पडलेली वाळलेली, रोगग्रस्त पाने गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावली.
सध्या तापमान वाढत असल्याने आवश्यकतेनुसार सिंचनाचा कालावधी कमी जास्त केला जाईल.
रासायनिक खतांच्या मात्रा आठवड्याच्या वेळापत्रकानुसार देण्यात आल्या.
आगामी नियोजन
दिवसाआड फुलांची काढणी, दर्जेदार पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविली जातील.
पिकाचे कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी सातत्याने निरिक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणी घेतली जाईल.
वेळापत्रकानुसार ठिबकद्वारे रासायनिक खतांचे डोस दिले जातील.
खत व्यवस्थापन
दर ३ ते ४ महिन्यांतून एकदा रासायनिक खते, सेंद्रिय खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे बेसल डोस दिले जातात. रासायनिक खतांचे आठवड्याचे वेळापत्रक ठरविले आहे. त्यानुसार ड्रीपद्वारे त्या त्या दिवशी मात्रा दिल्या जातात.
सोमवार आणि शुक्रवार : ०ः५२ः३४ हे १२०० ग्रॅम, ०ः०ः५० हे ६०० ग्रॅम, १२ः६१ः०० हे ३०० ग्रॅम, मॅग्नेशिअम सल्फेट ५०० ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये १०० ग्रॅम प्रमाणे ठिबकद्वारे दिली जातात.
बुधवार : १३ः०ः४५ हे ५०० ग्रॅम, फेरस (६ टक्के) १०० ग्रॅम प्रमाणे दिले जाते.
रविवार : ह्युमिक ॲसिड किंवा स्लरीचा आठवड्याच्या अंतराने आलटून-पालटून वापर केला जातो.
विठ्ठल झेंडे, ९६२३१४१४६९ (शब्दांकन : संदीप नवले)
FAQ : Flower farming planning
[sc_fs_multi_faq headline-0=”h2″ question-0=”जरबेरा डेझी दरवर्षी परत येतात का?” answer-0=”युनायटेड स्टेट्सच्या बर्याच भागांमध्ये, जरबेरास हे कोमल बारमाही आहेत जे दरवर्षी परत येतात . हिवाळ्यातील संरक्षणाशिवाय थंड हिवाळ्यातील झोनमध्ये, या वनस्पतींना वार्षिक मानले जाते. दंव होण्याची सर्व शक्यता संपल्यानंतर वसंत ऋतूमध्ये त्यांची लागवड उत्तम प्रकारे केली जाते.” image-0=”” headline-1=”h2″ question-1=”जरबेरा डेझीला किती पाकळ्या असतात?” answer-1=”तीन पाकळ्या स्वतंत्रपणे ओळखल्या जाऊ शकत नाहीत. उरलेल्या दोन पाकळ्या (ज्याला “पृष्ठीय” पाकळ्या म्हणतात), वेगळ्या दिसतात आणि फुलांच्या मध्यवर्ती डिस्कला तोंड देतात. त्यामुळे फुलांना पाच पाकळ्या असतात, त्यापैकी फक्त तीनच दिसतात. तीन कमी क्लिष्ट जरबेरा ब्लूम्स खाली दिसू शकतात.” image-1=”” headline-2=”h2″ question-2=”जरबेरा डेझी बियाण्यापासून वाढण्यास कठीण आहे का?” answer-2=”जरबेरा डेझी बियाण्यापासून वाढणे थोडे अवघड आहे, परंतु ते निश्चितपणे केले जाऊ शकते. तुमच्या बागेत बियांपासून जरबेरा डेझीचा प्रसार आणि वाढ करण्यासाठी या टिपांचे अनुसरण करा. व्यवहार्य बिया गोळा करा: ही सर्वात महत्वाची टीप आहे!” image-2=”” headline-3=”h2″ question-3=”जरबेरा फुलण्यासाठी कसा मिळेल?” answer-3=”कमी मधली संख्या (जसे की 15-7-15 किंवा 12-2-12) असलेल्या पाण्यात विरघळणाऱ्या खताने दर दोन आठवड्यांनी खते द्या . हे फुलण्यास मदत करेल आणि पानांची वाढ होणार नाही. जरबेरास सतत फुलणार नाहीत. ते फुलतात, नंतर इंधन भरण्यासाठी सुमारे दोन आठवड्यांचा ब्रेक घेतात आणि पुन्हा फुलतात.” image-3=”” count=”4″ html=”true” css_class=”” फुलशेतीतून चांगलं उत्पन्न]