कृषी महाराष्ट्र

जैविक कीड नियंत्रण कसे करावे ? वाचा संपूर्ण माहिती

जैविक कीड नियंत्रण कसे करावे ? वाचा संपूर्ण माहिती

जैविक कीड नियंत्रण

जैविक कीड नियंत्रणासाठी जगभरात उपयोगात येणारा प्रमुख मित्र कीटक म्हणजे अंडीचे परजीविकरण करणारा ट्रायकोग्रामा मित्र कीटक. ट्रायकोग्रामा कीटक हा हायमेनोप्टेरा गण व ट्रायकोग्रामा टीडी कुटुंबात मोडणारा परोपजीवी मित्रकीटक असून ट्रायकोग्रामाच्या ८0 पेक्षा जास्त प्रजाती आहेत.

ट्रायकोग्रामा मित्रकीटक निसर्गतःच सर्वच प्रकारच्या वातावरणात तसेच संपूर्ण जगभरात आढळत असून पतंगवर्गीय, भुंगेरावर्गीय, माशीवर्गीय, ढेकूणवर्गीय कीटकांच्या अंडीवर परजीविकरण करणारा परोपजीवी कीटक असून ट्रायकोग्रामाचे जैविक कीड व्यवस्थापनात प्रभावी मित्रकीटक आहे. ट्रायकोग्रामा कीटक आकाराने अतिशय लहान (०.२ ते १.५ मि.मी.) असून प्रौढ ट्रायकोग्रामा मित्रकीटक अंडी अवस्थेतच किडीचे नियंत्रण करतात.

पतंगवर्गीय कीटकांच्या अंडी शोधून त्यात अंडनिक्षेपक अंड्यांमध्ये घुसवून आपले अंडे टाकते. त्यानंतर अंडेनिक्षेपक घातलेल्या छिद्रातून आंतरिक दाबामुळे एक छोटा बलक बाहेर येतो व त्या बलकावर मादी माशी खाते.

त्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढते. एक ट्रायकोग्रामा मादी दररोज १ ते १० अंड्यांचे परजीविकरण तर संपूर्ण आयुष्यमानामध्ये १० ते १९० अंड्यांचे परजीविकरण करते. ट्रायकोग्रामाची मादी माशी यजमानरूप प्रति यजमान १ ते २० अंडी घालून त्यावर परजीविकरण करते.

एक मादी तिच्या संपूर्ण आयुष्यक्रमात २० ते २०० अंडी घालते व ट्रायकोग्रामाची अंडी घालण्याची क्षमता ही तिची प्रजाती, यजमान कीटक व तिचे आयुष्यमान यावर निर्धारित असते. ट्रायकोग्रामा कीटक नैसर्गिक परिस्थितीमध्ये परजीविकरण झालेल्या अंडी ओळखून त्यात परत परजीविकरण करत नाही.

ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटकाचा जीवनक्रम अंडी (१ दिवस), अळी (३-४ दिवस), कोष (४ ते ५ दिवस) व प्रौढ (६ ते ८ दिवस) अशा चार अवस्थांचा असतो. ट्रायकोग्रामाचे पूर्ण आयुष्य १५ ते २० दिवसांचे असते. प्रौढ ट्रायकोग्रामाचे आयुष्यमान कमी असून त्यांचे लिंग गुणोत्तर प्रमाण १:१ असतो. सर्वसाधारणपणे कोषामधून प्रौढ माशी बाहेर पडल्यानंतर लगेच नर व मादीचे मीलन होते व त्यानंतर लगेच मादी ट्रायकोग्रामा अंडी घालण्यासाठी सज्ज होतात.

source : krishijagran

FAQ : How to do biological pest control

[sc_fs_multi_faq headline-0=”h2″ question-0=”जैविक नियंत्रण म्हणजे काय?” answer-0=”जीवशास्त्रीय नियंत्रण म्हणजे भक्षक आणि परजीवी किंवा बुरशी आणि विषाणू यांसारख्या रोगजनकांच्या फायदेशीर कीटकांचा मानवांनी अवांछित कीटक, तण किंवा रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेला वापर .” image-0=”” headline-1=”h2″ question-1=”कीटकांचे जैविक नियंत्रण कसे केले जाते?” answer-1=”जैविक नियंत्रणामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य पद्धतीने कीटक कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी परजीवी आणि भक्षक यांसारख्या नैसर्गिक शत्रूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि मुक्तता यांचा समावेश होतो. रेडिएशनचा वापर अशा नैसर्गिक शत्रूंचे संगोपन, शिपिंग आणि तैनाती यांची उपयुक्तता, खर्च-प्रभावीता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी केला जातो.” image-1=”” headline-2=”h2″ question-2=”कीटक नियंत्रित करण्यासाठी 4 जैविक पद्धती काय आहेत?” answer-2=”शेतात जैविक नियंत्रण वापरण्याच्या तीन प्राथमिक पद्धती आहेत: 1) विद्यमान नैसर्गिक शत्रूंचे संवर्धन, 2) नवीन नैसर्गिक शत्रूंचा परिचय करून देणे आणि कायमस्वरूपी लोकसंख्या (ज्याला “शास्त्रीय जैविक नियंत्रण” म्हणतात), आणि 3) मोठ्या प्रमाणात संगोपन आणि नियतकालिक प्रकाशन, एकतर हंगामी आधारावर किंवा पूरस्थितीनुसार.” image-2=”” headline-3=”h2″ question-3=”कीटक नियंत्रणाच्या जैविक नियंत्रण पद्धतीचे उदाहरण कोणते आहे?” answer-3=”जैविक नियंत्रणाच्या उदाहरणांमध्ये कॅलिफोर्नियातील सायट्रोफिलस मेलीबगचा नाश ऑस्ट्रेलियातून आयात केलेल्या कॅलसिड वेप्सच्या दोन परजीवी प्रजाती, कोकोफॅगस गुरनेई आणि टेट्राक्नेमस प्रिटिओसस यांचा समावेश होतो ; ऑस्ट्रेलियन लेडीबर्ड बीटल किंवा वेडालिया बीटल (रोडोलिया कार्डिनालिस) ची प्रभावी शिकार…” image-3=”” headline-4=”h2″ question-4=”जैविक कीटकनाशके कसे तयार करावे?” answer-4=”कीटकनाशक तयार करण्याकरिता १ किलो गूळ, २ किलो तांदळाचे पीठ, २ लिटर गोमुत्र, ५० ग्रॅम ईस्ट पावडर, १ लिटर मेटॉराझियम एनीसोप्ली कल्चर व १०० लिटर पाण्याचा वापर करून द्रावण तयार करण्यात आले.” image-4=”” count=”5″ html=”true” css_class=””]

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top