पीएम किसानचा १४ वा हप्ता मे महिन्यात मिळणार : तातडीने करा केवायसी !
पीएम किसानचा १४
PM Kisan Yojana : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा १४ वा हप्ता मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० एप्रिल २०२३ च्या आधी लाभार्थी शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक आधारला जोडून घ्यावं. ई केवायसी (PM Kisan Status KYC) करून घ्यावी.
तसेच भूमी अभिलेख नोंदी पोर्टलवर अपडेट कराव्यात असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे महाराष्ट्र राज्य अंमलबजावणी प्रमुख आहेत.
केंद्र सरकारकडून फेब्रुवारी २०२३ दरम्यान १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्यानंतर एप्रिल ते जुलै महिन्याच्या दरम्यान १४ वा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र मे महिन्यात १४ वा हप्ता जमा होईल, असं चव्हाण यांनी सांगितलं.
राज्यातील १ कोटी १० लाख ३९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत २३ हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहितीही कृषी आयुक्त चव्हाण यांनी दिली. PM Kisan
केंद्र सरकारने २०१८ मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने जाहीर केली. २०१९ मार्चपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. आजवर या योजनेचे १३ हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांचा खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना आता १४ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे.
या योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना दर तीन महिन्याला २ हजार रुपये रक्कम देण्यात येते. म्हणजे वर्षभरात ६ हजार रुपये तीन टप्प्यात देण्यात येतात.
केवायसी कशी कराल ?
केंद्र सरकार पीएम किसान योजनांचा लाभ थेट हस्तांतरण (डीबीटी) माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. त्यामुळे शेतकऱ्यांचा बँक खात्याला आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे. ई केवायसीसाठी पीएम किसान सन्मान योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर केवायसी करता येते.
पीएम किसानची वेबसाईट ओपन केल्यावर सुरुवातीला ई केवायसीचा पर्याय दिसतो. त्यावर शेतकऱ्यांनी मोबाइल नंबर द्यायचा आहे. मोबाइल नंबर रजिस्टर्ड केल्यास मोबाईलवर ओटीपी येईल. तो रकण्यात भरून एन्टर बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर सबमिट पर्यायवर क्लिक केल्यानंतर केवायसी पूर्ण होते. पीएम किसानचा १४ पीएम किसानचा १४
source:agrowon