कृषी महाराष्ट्र

Rojgar Hami Yojana : ‘रोजगार हमी योजनेंतर्गत’ आता फळबाग, फुलपीक लागवड करता येणार ! वाचा सविस्तर

Rojgar Hami Yojana : ‘रोजगार हमी योजनेंतर्गत’ आता फळबाग, फुलपीक लागवड करता येणार ! वाचा सविस्तर

Rojgar Hami Yojana

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) आतापर्यंत फळबाग व फुलपीक लागवड करता येत नव्हती. यंदापासून मात्र या योजनेत ही लागवड करता येणार आहे. शेतकऱ्यांना २५०० हेक्टर क्षेत्रावर अशी लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने (Agriculture Department) केले आहे.

ज्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत फळबाग, फुलपीक लागवड करावयाची असेल त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, अशी सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २०२३-२४ अंतर्गत जिल्ह्यास एकूण २५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे लक्षांक प्राप्त झाला आहे.

योजनेत फळबाग लागवड व फुलपीक लागवडीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. Fruit Orchard

योजनेंतर्गत कमीत कमी ०.०५ हेक्टर ते जास्तीत जास्त २.०० क्षेत्रावर इच्छुक लाभार्थ्यांना लागवडीचा लाभ देण्यात येत असून, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निरधी सूचित जमाती, दारिद्यरेषेखालील कुटुंब, स्त्री कुटुंबप्रमुख असलेले कुटुंब, जमीन सुधारणाचे लाभाथी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेंतर्गत लाभार्थी, अनु. जमातीचे व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम २००६ मधील पात्र लाभार्थी, इत्यादी लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

संबंधित योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे सातबारा उतारा, ८-अ उतारा, मजूरकार्ड (जॉबकार्ड), इत्यादी कागदपत्रे, तसेच ग्रामपंचायतीने मान्य केलेली लाभार्थी यादीत नाव असणे व प्रपत्र-अ व प्रपत्र-ब (फळबागेचे कार्य ग्रामपंचायत किंवा कृषी विभाग यापैकी कोणाकडून राबविण्यात रस आहे, याचा स्पष्ट उल्लेख असावा) सादर करणे बंधनकारक आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण फळबाग लागवड योजनेंतर्गत केळी, आंबा, चिकू, पेरू, बोर, सीताफळ, कागदी लिंबू, डाळिंब, आवळा, सीताफळ, मोसंबी इत्यादी फळपिके व गुलाब, मोगरा, निशिगंध, सोनचाफा इत्यादी फुलपिके लागवडीचा लाभ देण्यात येतो.

या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक पात्र लाभार्थ्यांने विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र- अ) व संमतीपत्र (प्रपत्र-ब) ऑफलाइन पद्धतीने आपल्या गावातील ग्रामपंचायत किंवा संबंधित कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करावेत. Rojgar Hami Yojana Rojgar Hami Yojana

source:agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top