कृषी महाराष्ट्र

Crop Damage E-Survey : राज्यात नुकसानग्रस्त पिकांचे ‘ई-पंचनामे’ होणार ! मुख्यमंत्र्यांची घोषणा

Crop Damage E-Survey : राज्यात नुकसानग्रस्त पिकांचे ‘ई-पंचनामे’ होणार ! मुख्यमंत्र्यांची घोषणा

Crop Damage E-Survey

Crop Damage Update : नुकसानग्रस्त शेती पिकांचे ई-पंचनामे (E Survey In Crop) करण्याची घोषणा सोमवारी (ता.२४) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहावर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) व विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.

यंदाच्या जूनपासून ई-पंचनामे करण्यात येणार आहेत. राज्यात अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला जातो. अशावेळी शेतकऱ्यांना सरकारी मदतीच्या आधाराची गरज असते. Chief Minister Eknath Shinde

परंतु कासवगतीने पंचनामे केल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची अचूक आकडेवारी वेळेत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळत नाही. यावर उपाय म्हणून यंदाच्या खरीप हंगामापासून म्हणजेच जूनपासून राज्यात ड्रोन आणि उपगृहाच्या मदतीने पीक नुकसानीचे ई-पंचनामे करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

तंत्रज्ञानाचा वापर करून पंचनामे वेळेत पूर्ण होतील, तसेच शेतकऱ्यांना वेळेत मदत पोचेल असे मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी सांगितले. एसडीआरएफचे वाढीव दर लागू करण्यात आले आहेत. तसेच तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे. Crop Damage Survey

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असुन त्यांना आधार देणे हेच कर्तव्य असल्याचे शिंदे म्हणाले.

मागील दोन महीने शेतकऱ्यांना गारपीट आणि वादळी पावसाने जेरीस आणलं. शेतकऱ्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या पिकांचं नुकसान झालं. परंतु पंचनाम्यांचं आकडेवारी हाती न आल्याने राज्य सरकारने मदत जाहीर केली नाही.

राज्यात दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीचा फेरा शेतकऱ्यांना भोगावा लागतो. वादळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळ, उष्णतेची लाट इत्यादि आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं.

जूनपासून संगणकीय तंत्र पद्धतीचा वापर करून पंचनामे करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना त्यामुळे तातडीने मदत मिळेल. ई-पीक पंचनामे पारदर्शक असतील. त्यात मानवी हस्तक्षेप नसेल असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. Crop Damage E-Survey

source:agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top