कृषी महाराष्ट्र

PM Kisan : १५ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसानचा १५ वा हफ्ता ! वाचा सविस्तर

PM Kisan : १५ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसानचा १५ वा हफ्ता ! वाचा सविस्तर

 

PM Kisan : केंद्र सरकारकडून मागच्या ५ वर्षांपासून पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन हफ्त्यात ६ हजार रुपये दिले जातात. दरम्यान यंदाच्या वर्षातील पीएम किसानचा शेवटचा १५ वा हफ्ता मिळण्याची प्रतीक्षा आता संपली आहे.

दिवाळी संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे बोलले जात होते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हफ्ता १५ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत १४ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. PM Kisan

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हफ्त्याची रक्कम जमा होणार आहे. परंतु ज्यांना याचा लाभ मिळत नाही त्यांनी ईकेवायसी करणे गरजेचे आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १५ वा हप्ता १५ नोव्हेंबर २०२३ ला देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जाणार आहे. जर तुम्हीही पीएम किसानच्या १५ व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर लाभार्थी यादीत तुमचे नाव एकदा नक्की तपासा. PM Kisan

लाभार्थी यादीत तुमचं नाव कसे तपासावे :

  1. पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या
  2. पेमेंट सक्सेस टॅबच्या खाली तुम्ही भारताचा नकाशा पाहू शकाल.
  3. उजव्या बाजूला पिवळ्या रंगाचा टॅब डॅशबोर्ड दिसेल, त्यावर क्लिक करा
  4. तुम्हाला तुमचा संपूर्ण तपशील डॅशबोर्ड टॅबवर भरा.
  5. राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि पंचायत निवडा.
  6. यानंतर तुम्ही तपशील निवडू शकता.
  7. या योजनेची स्थिती पाहा
  8. पीएम किसान वेबसाइटला https://pmkisan.gov.in/ भेट द्या
  9. ‘तुमची स्थिती जाणून घ्या’ (Know Your Status) या पर्यायावर क्लिक करा
  10. नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  11. Get data वर क्लिक करा
  12. आता तुम्हाला स्टेटस दिसेल. ज्यामुळे तुम्ही लाभार्थी यादीत आहात की नाही हे स्पष्ट होईल.

PM Kisan

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती