कृषी महाराष्ट्र

दोन गुंठे जागेत घेतले ३३५ किलो कंदपीक : वाचा संपूर्ण माहिती

दोन गुंठे जागेत घेतले ३३५ किलो कंदपीक : वाचा संपूर्ण माहिती

३३५ किलो कंदपीक

सुरण या कंदपिकाची लागवड या ठिकाणी घेण्यात आली होती. कोकणात सातत्याने होणारा हवामान बदल त्यामुळे आता पीकपद्धती बदलण्याची गरज आहे.

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने (BSKKV) कोकणातील काही शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर कंदपीक लागवड (Cultivation of Tuber crop) ग्रामबीजोत्पादन (Seed Production) प्रयोग राबवून यशस्वी केला आहे.

हा प्रयोग दापोली व खेड तालुक्यांतील काही शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर यशस्वी झाला आहे. केवळ दोन गुंठे जागेत जवळपास ३३५ किलो उत्पादन मिळाले. कमीत कमी जागेत चांगले उत्पन्न आणि कंदपिकांची बियाणे विक्रीही उत्तम होते.

सुरण या कंदपिकाची लागवड या ठिकाणी घेण्यात आली होती. कोकणात सातत्याने होणारा हवामान बदल त्यामुळे आता पीकपद्धती बदलण्याची गरज आहे.

यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल, असे मत कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ, प्राध्यापकांनी व्यक्त केल आहे.

कोकणात खरीप हंगामात कमीत कमी जागेत फार कोणतीही मेहनत न घेता हे पीक उत्तमरित्या येऊ शकते हे आता स्पष्ट झाले आहे.

कोकणात खरीप हंगामात भातशेती केली जाते, याला मेहनत व मनुष्यबळही खूप लागते. तसेच काळजीही घ्यावी लागते.

या सगळ्याला आता कंदपिकाची लागवड हा भविष्यात उत्तम पर्याय ठरू शकेल, असे या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे.

खेड तालुक्यात कळंबणी, सुकीवली, दापोली तालुक्यातील सडवे, शिवाजीनगर, वाकवली, शिवाजीनगर येथील शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेऊन कंदपिकांची बियाणे विक्री केली आहे.

एक ते तीन गुंठ्यांमध्ये ही लागवड त्यांनी केली आहे. सुकीवली येथील सूर्यकांत धाडवे, सडवेतील रमेश टेमकर या शेतकऱ्यांनी केवळ दोन गुंठ्यांत ३३५ किलो, वाकवलीतील राजाराम शिगवण यांनी केवळ एका गुंठ्यात २१५ किलो इतके भरघोस उत्पादन घेतले आहे.

विशेष म्हणजे या कंदपिकाच्या लागवडीनंतर कोणतीही फवारणी अथवा कोणतीही मेहनत घ्यावी लागत नाही तसेच किलोमागे जवळपास ७० ते ८० रुपये किलो इतका दर हे मिळतो.

कोकणात पिकाच्या लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. विद्यापिठाअंतर्गत चालू असलेल्या वाकवली येथील अखिल भारतीय समन्वित कंदपिके योजनेमध्ये कोकणात होणाऱ्या विविध कंदपिकांवर संशोधन चालू आहे.

या प्रकल्पाच्या संशोधनातून कणघर, रताळी, अळू, पोरकंद आदी कंदपिकाच्या विविध जाती विकसित केल्या आहेत तसेच विविध पिकांच्या लागवड पद्धती प्रमाणित करून त्याचीही शेतकऱ्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे.

बदलत्या हवामानाचा परिणाम नसल्याचा निष्कर्ष

सध्याच्या बदलत्या हवामानाचा या पिकाच्या वाढीवर कोणताही विपरित परिणाम झालेला नाही, असा निष्कर्ष या संशोधनाअंती नोंदवण्यात आला आहे.

तसेच इतर पिकाच्या तुलनेने किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी असल्याने सध्या शेतकरीवर्ग कंदपिकाच्या लागवडीकडे वळला आहे. त्यामुळे कंदपिकाच्या लागवडीसाठी कट, रोपे, खोड याला मागणी आहे.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top