कृषी महाराष्ट्र

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पोस्टात खाते उघडण्याची मुभा !

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पोस्टात खाते उघडण्याची मुभा !

 

पुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) पात्र लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते उघडण्यासह आधार क्रमांकाशी (Adhaar Numbar) जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्ट (Post) मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्याची सुरुवात बुधवारपासून (ता. १) झाली असून, ती १२ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या सुविधेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन कृषी आयुक्तालयातील विस्तार व प्रशिक्षण विभागाचे कृषी संचालक विकास पाटील (Director of Agriculture Vikas Patil) यांनी केले आहे.

केंद्र शासनातर्फे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे सहा हजार रुपये प्रति वर्षी लाभ देण्यात येतो.

या योजनेच्या १३ व्या हप्त्याचा लाभ जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू असून, त्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.

राज्यात सद्यःस्थितीत १४ लाख ३२ हजार लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे.

त्यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रांच्या आधारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत खाते उघडावे.

सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासांत जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती ‘आयपीपीबी’मध्ये उघडून ती आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी राज्याच्या ‘आयपीपीबी’ कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थ्यांना संपर्क करून ‘आयपीपीबी’मध्ये बँक खाती सुरू करतील. या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top