कृषी महाराष्ट्र

Seed Availability : रब्बीसाठी नगर जिल्ह्यात ६० टक्के बियाणे उपलब्ध

Seed Availability : रब्बीसाठी नगर जिल्ह्यात ६० टक्के बियाणे उपलब्ध

 

Seed Availability : जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात ३ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे. पेरणीला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या मागणीनुसार आतापर्यंत ६० टक्के बियाणे उपलब्ध झाले आहे. यंदा रब्बी हंगामाचा विचार करता कोणत्याही वाणांचे बियाणे कमी पडणार नाही, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

नगर जिल्ह्यात रब्बीचे ४ लाख ५७ हजार १२६ हेक्टर सरासरी क्षेत्र असून गेल्या वर्षी ४ लाख २५ हजार ६५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. शिवाय पाणीसाठवणही पुरेशी झालेली नाही. त्याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार असल्याचे दिसते आहे. Seed Availability

यंदा ३ लाख ९४ हजार १७० हेक्टरवर रब्बीची पेरणी होईल असे गृहीत धरून क्षेत्र प्रस्तावीत केले आहे. त्यानुसार तसेच बियाणे बदल, मागील तीन वर्षांत झालेल्या बियाण्यांची विक्री याचा विचार करून ३० हजार ८४३ क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती.

त्यातील आतापर्यंत १७ हजार ९८६ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. २०२० मध्ये ३५ हजार ९३ क्विंटल, २०२१ मध्ये ३८ हजार ८८६ क्विटंल, २०२२ मध्ये ४१ हजार ०८५ क्विटंल बियाण्यांची विक्री झाली होती. Seed Availability

गव्हाची सर्वाधिक बियाणे बदलाचे प्रमाण आहे. मात्र यंदा पाऊस नसल्याने गव्हाचे क्षेत्र कमी होईल, ज्वारीचे क्षेत्र वाढेल असा अंदाज असून त्या अनुंषंगानेच बियाण्यांची मागणी केली आहे. यंदा शेतकऱ्यांना कोणत्याही बियाणांची कमतरता भासणार नाही असे जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी अमृत गांगर्डे यांनी सांगितले.

रब्बीत पेरणी होण्याचा अंदाज असलेले क्षेत्र (हेक्टर) व उपलब्ध बियाणे

ज्वारी : २,१५,००० (४५५६)

गहू : ४५,००० (९८०)

हरभरा : ६०,००० (७४१२)

सूर्यफूल : १०० (०)

करडई : ७० (५०)

मका : ७४,००० (४९८८)

Seed Availability

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top