Cotton, Soybean Rate : कापूस, मूग, सोयाबीन भावामध्ये घसरण ! वाचा सविस्तर
Cotton
Market Committee : फ्यूचर्स किमती – सप्ताह १० ते १६ जून २०२३
या सप्ताहात कापूस, हरभरा, मूग, सोयाबीन यांच्या किमती घसरल्या. कांद्यातील घसरण आता थांबलेली आहे; पिंपळगावमधील किमती रु. १००० च्या वर गेल्या आहेत. टोमॅटोच्याही किमती वाढल्या आहेत.
१६ मे रोजी संपणाऱ्या सप्ताहातील किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.३ टक्क्याने घसरून रु. ५८,१८० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ०.४ टक्क्याने घसरून रु. ५७,९२० वर आले आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स भाव रु. ५८,६२० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. ५८,५०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ०.६ टक्क्याने अधिक आहेत. कापसाचे भाव घसरण्याचा कल आहे. आवक आता कमी होत आहे.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,४४४ वर आले होते. या सप्ताहात ते याच पातळीवर स्थिर आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२० वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.३ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. Cotton, Soybean Market
मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्याने घसरून रु. १,७८० वर आल्या होत्या. त्या सप्ताहात त्या ३.४ टक्क्यांनी वाढून रु. १,८४० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जुलै डिलिव्हरी) किमतीसुद्धा ३.२ टक्क्यांनी वाढून रु. १,८५३ वर आल्या आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स किमती रु. १,८७५ वर आहेत.
स्पॉट भावापेक्षा त्या १.९ टक्क्याने अधिक आहेत. मक्याच्या गेल्या महिन्यातील किमती रु. १,७८० ते रु. १,८४० दरम्यान आहेत. आवक स्थिर आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात १.३ टक्क्याने वाढून रु. ७,४६९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.४ टक्क्यांनी वाढून रु. ७,७९६ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती ११ टक्क्यांनी वाढून रु. ८,८३२ वर आल्या आहेत.
ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. ८,८७० वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १३.८ टक्क्यांनी अधिक आहेत. डिसेंबर भावसुद्धा (रु. ८,५८४) चांगला आहे. फ्यूचर्स विक्रीला अजून अनुकूल संधी आहे. आवक कमी होत आहे.
रोजचे सर्व शेतमालाचे, सर्व जिल्ह्यांचे बाजारभाव बघण्यासाठी इथे क्लिक करा.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात २ टक्क्यांनी घसरून रु. ४,९०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्याने घसरून रु. ४,८७५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. सध्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. या महिन्यातील हरभऱ्याचे भाव रु. ४,८०० ते रु. ५,००० दरम्यान आहेत. आवक कमी होत आहे.
मूग
मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात १.९ टक्क्याने घसरून रु. ७,८५० वर आली आहे. मुगाची आवक गेल्या तीन सप्ताहात वाढू लागली आहे. गेल्या वर्षी ती जुलै मध्ये सर्वाधिक होती. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ जाहीर झाला आहे. Cotton, Soybean Market
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) रु. ५,१७६ वर आली होती. या सप्ताहात ती १.२ टक्क्याने वाढून रु. ५,२३९ वर आली आहे. नवीन वर्षासाठी सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात ३.७ टक्क्यांनी वाढून रु. ९,४९२ वर आली होती. या सप्ताहात ती १.१ टक्क्याने घसरून रु. ९,३९२ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० जाहीर झाला आहे. तुरीच्या भावात तेजी आहे. आवक कमी आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
source: agrowon