IMD Weather Forecast : आयएमडी हवामान अंदाज ! राज्यात पुढील पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार
Rain Update : पुढील पाच दिवसांत कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागांत काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज (ता. १७) हा अंदाज जाहीर केला.
मराठवाड्यातही या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्याच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. काल आणि आज बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. (IMD Weather Forecast)
देशातील बहुतांशी भागात पावसाचा जोर आज काहीसा कमी होता. तर काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. तसेच काही भागात जोरदार पावसाचा मोठा खंड आहे. आज माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, सिकर, ओराई, सिधी, अंबिकापूर, बालासोर भागात होता. तसेच हा कमी दाबावाचा पट्टा बंगालच्या उपसागराच्या भागात समुद्रसापाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. पश्चिम झारखंड आणि शेजारच्या उत्तर छत्तीसगड तसेच ओडिशाच्या उत्तर भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.
दक्षिण झारखंड आणि शेजारच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. बंगालच्या उपसागरात पुढील ४८ तासांमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला.
आज राज्याच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. रात्री मराठवाडा, विदर्भ, कोकण, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकामी मध्यम ते जोरदार सरी पडल्या. तर बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.
हवामान विभागाने आज पुणे जिल्ह्यात ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. ऑरेंज अलर्ट म्हणजे या जिल्ह्यातील हवामान विभागाने निश्चित केलेल्या केंद्रावर काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असते. IMD Weather Forecast
तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रागयगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, गडचिरोली, भंडारा, गोंदीया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान विभागाच्या निश्चित केलेल्या केंद्रांपैकी तूरळक केंद्रांवर पाऊस पडणार असेल तर त्या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिला जातो. म्हणजेच तूरळक ठिकाणी अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पाऊस होऊ शकतो.
source : agrowon