Solar Power : सोलापूर जिल्ह्यात ‘सौर कृषी’ साठी हवी दहा हजार एकर जमीन ! वाचा सविस्तर
Solapur News : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- २.०’ अंतर्गत जिल्ह्यासाठी २०३४ मेगावॉट सौर वीजनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी १० हजार १७० एकर जमिनीची आवश्यकता आहे. त्यासाठी महावितरणने शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर जमीन घेण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत.
दिवसा शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.०’ अंतर्गत ५ हजार ८६८ मेगावॅट सौर ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. Solar Power
यासाठी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ८७७ एकर शासकीय जमीन उपलब्ध झालेली आहे. तर एकूण ६०४ शेतकऱ्यांनी जमीन भाडेतत्त्वावर देण्यासाठी अर्ज केले आहेत. Solar Power
त्यापैकी १४१ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. यातून १ हजार ८२३ एकर जागा मिळणार आहे. उर्वरित अर्जावर कारवाई सुरू आहे. या योजनेनुसार डिसेंबर २०२५ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान ३० टक्के कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालविण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.
‘दिवसा आठ तास वीज मिळणार’
‘‘युद्धपातळीवर ही योजना राबविण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे सध्या शेतीला दिवसा आणि रात्री असा वीजपुरवठा केला जातो. रात्री शेतीला वीज मिळवत असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या योजनेमुळे शेतीसाठी दिवसा आठ तास भरवशाचा वीजपुरवठा होणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे,’’ असे आवाहन नाळे यांनी केले.
source : agrowon