कृषी महाराष्ट्र

Cotton Production : कापूस उत्पादन वाढीसाठी ३३०० हेक्टरवर प्रात्यक्षिके ! वाचा संपूर्ण

Cotton Production : कापूस उत्पादन वाढीसाठी ३३०० हेक्टरवर प्रात्यक्षिके ! वाचा संपूर्ण

 

Nagar News : कापूस उत्पादन वाढीसाठी यंदा नगर जिल्ह्यात अन्न व पोषण सुरक्षा-व्यापारी पिकेअंतर्गत कापूस विकास कार्यक्रम, राज्य पुरस्कृत कापूस पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेअंतर्गत दोन्ही योजनेतून नगर जिल्ह्यात ३३०० हेक्टरवर कापूस उत्पादन वाढीसाठी प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.

शिवाय साडेतीन हजार शेतकऱ्यांना पीक संरक्षण औषधे व बायोएजंट्‍स किटचेही वितरण केले जाणार आहे. सर्व बाबींवर सुमारे एक कोटी ६८ लाखांचा निधी खर्च होणार आहे.

नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नेवासा, जामखेड, कर्जत भागांत कापसाची लागवड अधिक होते. अलीकडच्या काळात नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत कापसाची लागवड होत आहे.

नगर जिल्ह्यात कापसाचे ४ लाख ४७ हजार ८२२ हेक्टर सरासरी क्षेत्र असून यंदा१,१४,३५२ हेक्टरवर कापसाची लागवड होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मात्र पुरेसा पाऊस नसल्याने कापसाच्या लागवडीला अडथळे येत आहेत. कृषी विभागाकडून यंदा नगर जिल्ह्यात कापूस उत्पादन वाढीसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. Cotton Production

कापसाच्या सरळ वाणाची अतिघन लागवड पद्धतीने पाथर्डी व शेवगाव तालुक्यांत प्रत्येकी दहा हेक्टरवर लागवड प्रात्यक्षिक असेल. एकात्मिक पीक व्यवस्थापनांतर्गत पाथर्डी, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा तालुक्यांत प्रत्येकी दहा हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके केली जाणार आहेत.

राज्य पुरस्कृत कापूस पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेअंतर्गत शेतकरी कंपन्या, शेतकरी समूहाच्या मदतीने कापूस उत्पादन वाढीसाठी प्रत्येकी शंभर हेक्टरचा एका अशा पद्धतीने प्रात्यक्षिके राबवली जात आहेत.

त्यात उत्पादन वाढ अंतर्गत पाथर्डीत २ कंपन्यांमार्फत ८०० हेक्टर, कर्जतला एका कंपनीमार्फत ४०० हेक्टर व शेवगावला चार कंपन्यांमार्फत १६०० हेक्टर, अतिघन लागवड योजनेतून पाथर्डी व जामखेडला प्रत्येकी एका शेतकरी समुहामार्फत प्रत्येकी १०० हेक्टर, शेवगावला २ शेतकरी समूहामार्फत २०० हेक्टर प्रत्यक्षिके घेतली जाणार आहेत. Cotton Production

आद्यरेषीय आंतरपिके, एकात्मिक पीक व्यवस्थापन, उत्पादकता वाढ यासाठी प्रत्येक हेक्टरसाठी आठ हजार, कापसाच्या सरळ वाणाची अतिघन लागवडीसाठी हेक्टरी १० हजार, पीक संरक्षण औषधे व बायोएजंट्‍स किटसाठी प्रत्येकी ५०० रुपये असे एकूण १ कोटी ६८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

पीक संरक्षण किट, शेतीशाळा

नगर जिल्ह्यात कापूस पीक प्रात्यक्षिकांससोबत साडेतीन हजार शेतकऱ्यांना पीक संरक्षण औषधे व बायोएजंट्‍स किटचेही वितरण केले जाणार आहे. याशिवाय कापूस उत्पादनाबाबतच्या विविध माहिती, मार्गदर्शनासाठी १२८ शेतीशाळा घेतल्या जाणार आहेत, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

source : agrowon

Cotton Production

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top