कृषी महाराष्ट्र

ऊस तोडीसाठी पैसे मागितल्यास होणार कारवाई ! कोणत्या क्रमांकावर संपर्क करावा ? वाचा संपूर्ण

ऊस तोडीसाठी पैसे मागितल्यास होणार कारवाई ! कोणत्या क्रमांकावर संपर्क करावा ? वाचा संपूर्ण

ऊस तोडीसाठी पैसे

Sugarcane | महाराष्ट्रात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. शेतकरी देखील मोठ्या जोमात उसाची लागवड (Sugarcane Cultivation) करून ऊस उत्पादन घेण्याला पसंती देतात. याचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farming) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेकदा ऊस तोडणीसाठी मुकादम शेतकऱ्यांकडे पैसे (Financial) मागतात. मात्र, याबाबत आता शेतकऱ्यांना मुकादमांनी ऊस तोडणीसाठी पैसे मागितल्यास मुकादम यांना चांगलाच फटका बसणार आहे.

ऊस तोडणीला आल्यास मुकादम यांनी शेतकऱ्यांकडे (Department of Agriculture) ऊस तोडणीचे पैसे मागितल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येणार आहे. ऊस तोडणीसाठी पैसे मागितल्यास मुकादम यांच्यावर कारवाई करण्याकरता शेतकऱ्यांनी (Agricultural Information) थेट संपर्क साधावा अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव यांनी दिली आहे.

काय म्हणाले सहसंचालक ?

त्याचवेळी ते भालेराव म्हणाले की, ”गेल्यावर्षी ऊस जास्त होता. त्यामुळे ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या. याचा फायदा घेत ऊसतोड (sugarcane production) कामगार, मुकादम, वाहनचालकांनी ऊस उत्पादकांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे यंदाही अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रत्येक साखर कारखान्यासाठी एक तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केला आहे. जर कोणत्याही शेतकऱ्यांना ऊसतोडणी करण्यासाठी पैसै मागितले तर तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे तक्रार करा.” यासाठी तक्रार निवारण अधिकारी नेमण्यात आले आहेत.

खाली दिलेल्या क्रमांकावर करा संपर्क

कर्मवीर कुंडलिकराव जगताप (कुकडी, श्रीगोंदा) :- एस. बी. कुटाळ- ९५५२५२१०२१,

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (कोपरगाव) :- जी. बी. शिंदे -९३२६२६५८५०,

मारुतराव घुले (भेंडा) :- सुरेश आहेर – ९६५७७२१४१०,

अंबालिका (राशीन) :- विठ्ठल भोसले -९३०७३२२३१९,

प्रसाद शुगर (वांबोरी) :- भरत काळे- ८००७०७८४१३,

युटेक शुगर (संगमनेर) :- तांबे – ७७९८९६३४००,

कर्मवीर शंकरराव काळे (कोळपेवाडी) :- व्ही. व्ही. कापसे – ८२०८४४२१३६,

अशोक सहकारी (श्रीरामपूर) :- नारायण चौधरी – ८२०८८६७६५५,

संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर (बोधेगाव) :- अभिमन्यू विखे – ९३७०९०११२७,

क्रांती शुगर (देवीभोयरे) :- जाधव -७०२८०३८१८१,

जयश्रीराम (हळगाव, जामखेड) :- पडवळ – ९९७०००८९२८

पद्मश्री विखे पाटील (राहाता) :- एन. जी. चेचरे – ९४२०४९४९८१,

गणेश सहकारी :- एस. एस. गमे – ९२८४६८९२८९,

सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) :- सचिन बागल- ९८५४५०४९९९,

मुळा सहकारी (सोनई)- व्ही. एच. फाटके – ९६५७०६०९४२,

अगस्ती (अकोले) :- सयाजीराव पोखरकर – ९८८१६८४५५५,

वृद्धेश्वर (पाथर्डी) :- के.एस. ढसाळ- ९४२३७५५२०४,

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (संगमनेर) :- भाऊसाहेब खर्डे – ७५८८०७७३३,

सोपानराव धसाळ (माळकूप, पारनेर) :- शिवाजी जंजिरे – ८८८८१६०००४,

गंगामाई (शेवगाव) :- विठ्ठल शिंदे- ९५५२०००७९९,

पियुष (नगर तालुका) :- एस.बी.मस्के – ९६२३०००७९९,

साजन शुगर (देवदैठण, श्रीगोंदा) :- नवनाथ दरेकर – ९९२२६१९५०४,

साईकृपा हिरडगाव :- विकास क्षीरसागर – ९५६१२१४५४६.

source: mieshetkari.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top