कृषी महाराष्ट्र

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करा !

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करा !

 

सोलापूर : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत (Employment Guarantee Scheme) लाभ घेता येऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संधी मिळावी, याकरिता शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Horticulture Scheme) सुरू केली असल्याची माहिती उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी श्रीमती मनीषा मिसाळ (Manisha Misal) यांनी दिली. Horticulture Subsidy | Schemes of NHB

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत एकूण १६ बहुवार्षिक फळपिकांचा समावेश करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार किंवा कृषी हवामान क्षेत्रास अनुसरून असलेल्या फळपिकांच्या कलमांची रोपांची कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या वाणाची लागवड करण्याची मुभा देण्यात आली आहे.

या योजनेकरिता किमान ०.८० हेक्टर ते ६ हेक्टरपर्यंत क्षेत्र मर्यादा असून, या योजनेत प्रामुख्याने आंबा कलमी, पेरू कलमी, डाळिंब कलमी, कागदी लिंबू कलमी सीताफळ कलमी नारळ रोपे, तसेच मोसंबी, काजू, संत्रा, जांभूळ, चिंच, आवळा, चिकू आदी फळपिकांकरिता अनुदान दिले जाते. शासनाकडून खड्डे खोदणे, कलमे व रोपे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे तसेच ठिबकद्वारे पाणी देणे याकरिता अनुदान देण्यात येते. Horticulture Subsidy | Schemes of NHB

या योजनेच्या लाभासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाडीबीडी पोर्टल या संकेतस्थळावरून अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित आपल्या गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा, असेही आवाहन तालुका कृषी अधिकारी मिसाळ यांनी केले आहे.

वैयक्तिक शेततळे योजना

मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. विविध आकारमानाच्या शेततळ्यांसाठी या योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे. वैयक्तिक शेततळ्यासाठीही कृषी विभागाच्या महाडीबीटी या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top