कृषी महाराष्ट्र

Biporjoy Cyclone : ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळ आज गुजरातला धडकण्याची शक्यता ! वाचा सविस्तर

Biporjoy Cyclone : ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळ आज गुजरातला धडकण्याची शक्यता ! वाचा सविस्तर

Biporjoy Cyclone

Biporjoy : पुणे : अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ (Biporjoy Cyclone) हे तीव्र झालेले चक्रीवादळ वेगाने गुजरातकडे झेपावत आहे. आज (ता. १५) सायंकाळपर्यंत ताशी १२५ ते १५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह ते गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यादरम्यान असलेल्या जखाऊ बंदराजवळ जमिनीवर येण्याची शक्यता आहे.

या वादळामुळे गुजरातला जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा (रेड अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

बुधवारी (ता.१४) ही प्रणाली गुजरातच्या जखाऊपासून २८० किलोमीटर पश्चिमेकडे, द्वारकेपासून २९० किलोमीटर, नालियापासून ३०० किलोमीटर नैर्ऋत्येकडे, पोरबंदरपासून ३५० किलोमीटर वायव्येकडे आणि पाकिस्तानच्या कराचीपासून ३४० किलोमीटर दक्षिणेकडे होती.

हे वादळ आज (ता. १५) सायंकाळपर्यंत गुजरातच्या मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची दरम्यान असलेल्या गुजरातच्या जखाऊ बंदराजवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.

वादळामुळे अरबी समुद्र खवळला आहे. त्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत. समुद्राला भरती आल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. किनारपट्टीवर ४५ ते ६५ किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहत आहेत.

या चक्रीवादळामुळे ईशान्य अरबी समुद्रात ताशी १४५ ते १७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. आजपासून (ता.१४) कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि सौराष्ट्राच्या मोरबी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे. Biporjoy Cyclone

पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

वादळामुळे किनाऱ्यावर २ ते ६ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. सखल भागात पाणी भरण्याबरोबरच पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

जोरदार वाऱ्यामुळे कच्ची पक्की घरे, विजांचे खांब, नारळ, आंब्यासारखी झाडे पडण्याची शक्यता आहे. रेल्वे, दूरसंचार, दळणवळणाच्या सुविधा देखील वादळामुळे प्रभावित होऊन जनजीवन विस्कळित होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top