कृषी महाराष्ट्र

Cotton Market Rate : कापूस दरात पुन्हा नरमाई ! बाजारावर कशाचा दबाव ? वाचा सविस्तर

Cotton Market Rate : कापूस दरात पुन्हा नरमाई ! बाजारावर कशाचा दबाव ? वाचा सविस्तर

Cotton Market

Cotton Rate Update : जून महिन्यात एरवी शेतकरी खरिपातील कापूस लागवडीच्या कामात व्यक्त असतात. पण यंदा अनेक शेतकऱ्यांना मागील हंगामातील कापूस भावाचीच चिंता लागून आहे. जून महिना उजाडला तरी कापसाचे भाव दबावातच आहेत.

त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना कमी भावात कापूस विकावा लागत आहे. देशातील बाजारात एकीकडे आवक वाढत असून दिसरीकडे शेतकऱ्यांना अजूनही भाववाढीची आपेक्षा आहे.

देशातील बाजारात नेमका किती कापूस आला आणि शेतकऱ्यांकडे किती कापूस शिल्लक आहे, यावरून संभ्रम तयार झालेला दिसतो. काही संस्थांच्या मते १० जूनपर्यंत देशातील बाजारात गेल्यावर्षीपेक्षा जास्त कापूस बाजारात आला. तर काही संस्थांच्या मते यंदाची आवक अद्यापही कमीच आहे.

शिवाय प्रत्येक संस्थेचा उत्पादनाचा अंदाज वेगळा दिसतो. कापूस हंगाम सुरु होऊन आता ९ महिने होतील. पण अजूनही देशातील उत्पादन नेमकं किती यावरूनच चर्चा रंगयायेत.

यंदा शेतकऱ्यांनी जास्त काळ कापूस मागे ठेवला त्यामुळे अनेकांचा अंदाज चुकला असे जाणकारांनी सांगितले. पण शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाही उत्पादन कमीच आहे, असेही जाणकारांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. आज वायदे ८२.६९ सेंट प्रतिपाऊंडवर होते. मागील तीन दिवसांच्या तुलनेत आज वायद्यांमध्ये नरमाई दिसली.

तर जगभरातील प्रत्यक्ष कापूस खरेदीच्या दराची सरासरी म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्सही गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाला. आज काॅटलूक ए इंडेक्स ९३.२५ सेंट प्रतिपाऊंडवर होता. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात नरमाई दिसली. Cotton Market

देशातील वायदेही कमी झाले. आज एमसीएक्सवर कापूस वायदे ६०० रुपयांनी नरमले होते. दुपारपर्यंत वायदे ५७ हजार ६०० रुपयांवर होते. तर बाजार समित्यांमधील भाव ६ हजार ९०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते.

तर बाजारातील कापूस आवक आजही ५० हजार गाठींच्या दरम्यान होती. सध्या महाराष्ट्रातील आवक काहीशी अधिक दिसते. आज महाराष्ट्रातील बाजारात २५ हजार गाठींची आवक झाली होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सध्या बाजारातील कापूस आवकेचा विचार करता पाच पटींनी फरक दिसतो. म्हणजेच आजही बाजारातील आवक गेल्यावर्षीच्या आवकेपेक्षा पाच पटींनी जास्त आहे. कापूस भाव कमी होतानाही बाजारातील आवक जास्तच राहते, यामुळे दर आणखी कमी होताना दिसतात.

आवक कमी झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसते. पुढील काळातही कापसाचे भाव बाजारातील आवक आणि खरिपातील लागवडीची गती यावर अवलंबून राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top