कृषी महाराष्ट्र

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ आणि पंतप्रधान किसान योजना या दोन्ही योजनेचे मे मध्ये ४ हजार मिळणार ! वाचा सविस्तर

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ आणि पंतप्रधान किसान योजना या दोन्ही योजनेचे मे मध्ये ४ हजार मिळणार ! वाचा सविस्तर

पंतप्रधान किसान योजना

PM Kisan |शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकारकडून नवनवीन योजना राबविल्या जातात. पंतप्रधान किसान योजना (PM Kisan Scheme) ही यातीलच एक योजना आहे. देशभरातील बहुतांश शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. दरम्यान प्रधानमंत्री किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारने (State Government) देखील नवीन योजना आणली आहे.

दोन्ही योजनांचे हप्ते मे मध्ये जमा होणार

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा पहिला हप्ता चालू मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मे महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजारऐवजी आता चार हजार जमा होणार आहे. ( Two installments in one month)

शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये मिळणार

केंद्रसरकारच्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. तीन हप्त्यात हे पैसे दिले जातात. दरम्यान आता राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ मधून सुद्धा शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सरकार कडून वार्षिक १२ हजार रुपये मिळणार आहेत. ( Namo Shetkari Mahasanman Nidhi)

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आधारावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ही योजना सुरू केली आहे. यंदाच्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली होती.

शेतकरी खुश !

ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे फक्त महाराष्ट्रातीलच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. राज्यातील जवळपास ९६ लाख शेतकऱ्यांना शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. डबल रक्कम मिळणार असल्याने राज्यातील शेतकरी सुद्धा सध्या खुशीत आहेत.

source : meshetkari

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top