आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मिळणार १५ लाखांच कर्ज ! व्याजदर ४ टक्के
१५ लाखांच कर्ज
राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी राज्य सरकराने योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. (Agriculture Loan)
ही योजना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’असे या योजनेचे नाव आहे. या योजनेंतर्गत राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील इयत्ता बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळणार आहे.
शून्य ते चार टक्के व्याजदराने १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या योजनेच्या मिळवता येणार आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे. या योजनेच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी १० वर्षांचा आहे. (Loan)
नोकरी लागल्यानंतर कर्जाची परतफेड असणार आहे. यामध्ये पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारण आणि जामीनदारांची आवश्यकता असणार नाही.
तसेच पाच लाख ते १० लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारणाची आवश्यकता नसेल, मात्र अर्जदाराला कर्जासाठी एका जामीनदाराची आवश्यकता असेल. १० लाख ते १५ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागणार आहे.
तसेच दोन जामीनदारांची आवश्यकता असेल. असे याचे स्वरूप असणार आहे. ५ लाखांपर्यंत शुन्य टक्के, पाच लाख ते १० लाखांपर्यंत २ टक्के तर १० लाख ते १५ लाखापर्यंत ४ टक्के व्याजदर लागणार आहे.
source : krishijagran