कृषी महाराष्ट्र

नाशिक मध्ये कोथंबीरीची जुडी १०० रुपयांवर !

नाशिक मध्ये कोथंबीरीची जुडी १०० रुपयांवर !

 

सध्या जर महागाईचा विचार केला तर सगळ्याच गोष्टींमध्ये महागाईने उच्चांक गाठला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याचे काम या महागाईने केले आहे. येणाऱ्या काही दिवसांचा विचार केला तर बटाटा आणि टोमॅटोचे बाजारभाव देखील उच्चंकी पातळी गाठतील अशी शक्यता आहे. यामागे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे यावेळी जो काही अतिवृष्टी सदृश्य पाऊस महाराष्ट्रात झाला त्यामुळे अनेक पिकांसोबत भाजीपाला पिकाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

जर आपण टोमॅटो उत्पादनाचा विचार केला तर मागच्या वर्षीच्या 21.18 दशलक्ष टनांच्या तुलनेमध्ये यावर्षी चार टक्क्यांनी घटू शकते असा एक अंदाज आहे. हीच परिस्थिती सगळ्या भाजीपाला पिकांच्या बाबतीत झाली असून पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने भाज्याचे दर कडाडले आहेत.

जर आपण एकंदरीत भाजीपाल्याच्या आवकेचा विचार केला तर यामध्ये 25 ते 30 टक्क्यांपर्यंत घट आली आहे. त्यामुळे नवीन भाजीपाला तयार होऊन बाजारात येण्याला अजून देखील दीड ते दोन महिने लागण्याची शक्यता असून तोपर्यंत भाज्यांचे बाजारभाव उच्चांकी पातळीवरच राहतील असा जाणकारांचा अंदाज आहे.

कोथिंबीर देखील कडाडली

या सगळ्या परिस्थितीमुळे कोथिंबीरचे बाजारभाव देखील कडाडले असून नाशिक मध्ये चक्क कोथिंबीरची एक जुडी शंभर रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे आहारामध्ये कोथिंबिरीचा वापर करावा की नाही हा एक मोठा प्रश्न गृहिणीसमोर पडला आहे. आपल्याला माहित आहेच की,रोजच्या आहारामध्ये चवीसाठी कोथिंबीरचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होतो. परंतु आता कोथिंबीर घेणे म्हणजे मोठे जिकीरीचे काम होऊन बसले आहे.

मागच्या काही दिवसा अगोदर कोथिंबीर अशाच पद्धतीने उच्चांकी पातळीवर गेली होती. परंतु त्यानंतर भावामध्ये थोडी घसरण होऊन 30 ते 40 रुपये जुडी असे दर कोथिंबिरीचे पाहायला मिळाले होते. परंतु मध्यंतरीच्या कालावधीत परत परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्यामुळे भाजीपाला पिकांची जैसे थी परिस्थिती झाली.

कोथिंबीरचा भाव वाढीमागे अनेक कारणे असून त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या दिवाळीची लगबग सुरू होती व यामुळे शेती कामामध्ये मजुरांची टंचाई भासली व शेतमाल हा शेतात तसाच पडून राहिला. हेच महत्त्वाचे कारण कोथिंबीरीची भाव वाढीमागे सांगता येईल.

सध्या बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची आवक अत्यंत मर्यादित स्वरूपात होत असून त्याला कोथिंबीर देखील अपवाद नाही. मागे काही दिवसांपासून कोथिंबिरीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असून कोथिंबीर खरेदी करणे दुरापास्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी 30 ते 40 रुपये जुडी असलेली कोथिंबीर चक्क शंभर रुपयांवर पोहोचली आहे. नाशिक मध्ये कोथंबीरीची

 

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top