कृषी महाराष्ट्र

सोयाबीनच्या दरात सुधारणा : किती मिळतोय बाजारभाव ?

सोयाबीनच्या दरात सुधारणा : किती मिळतोय बाजारभाव ?

 

सध्या सोयाबीनची आवक हळूहळू वाढत असताना दिसत आहे. त्याचबरोबर सोयाबीन (soyabean) बाजारभावात देखील वाढ होत असताना पाहायला मिळत आहेत. सध्या मिळत असलेले सोयबीनचे बाजारभाव जाणून घेऊया.

आपण पाहिले तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या (International Soybean Market) दरात काहीशी सुधारणा झाली होती. राज्यात मागील आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकरी चिंतामुक्त झाले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीच्या कामाला वेग दिला आहे.

महत्वाचे म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि इतर इतर सोयाबीन (soyabean) उत्पादक भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाने पिकाची गुणवत्ता कमी झाली. त्यामुळे शेतकरी मळणी करून लगेच सोयाबीन विक्रीला प्राधान्य देताना दिसत आहेत. चांगल्या गुणवत्तेचं सोयाबीन शेतकरी मागे ठेवत आहेत.

सध्या सोयाबीनमध्ये ओलावा जास्त असल्याने या मालाला प्रतिक्विंटल ४ हजार २०० रुपयांपासून ४ हजार ६०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. मात्र आता विक्रीला येत असलेल्या सोयाबीनमध्ये जास्त ओलावा असलेल्या सोयाबीनचं प्रमाण हळूहळू कमी होतंय. त्यामुळे बाजारातील किमान दरही काहीसे सुधारलेले दिसतात.

देशातील बाजारात सोयाबीनचा किमान दर काहीसा वाढला आहे. तर एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळतोय.

सध्याची मागणी आणि पुरवठ्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवस सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीनची विक्री केल्यास फायदेशीर ठरू शकते.

गुरुवारी दिवाळीनंतर सोयाबीन आणि इतर शेतमालाच्या भावाचा मुहूर्त मंडईंमध्ये होता. गुरुवारी मध्य प्रदेशातील जवळपास सर्व बाजूंनी कृषी उत्पन्न बाजारातील धान्य खरेदी-विक्रीचे काम दीर्घ सुट्टीनंतर पुन्हा सुरू झाले, या दरम्यान दिवाळीच्या सुट्टीनंतर मुहूर्तावर विक्री झाली.

चिमणगंज कृषी उत्पन्न बाजार उज्जैनमध्ये मुहूर्तावर 15301 रुपये भावाने सोयाबीन विकले गेले. यावेळी खासदार अनिल फिरोजिया, स्थानिक आमदार पारस जैन उज्जैन मंडीत उपस्थित होते. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खासदार, आमदारांनी व्यापाऱ्यांना अधिकाधिक बोली लावण्याचे आवाहन करत होते.

 

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top