कृषी महाराष्ट्र

कापूस विषयी सविस्तर माहिती – Cotton Information

कापूस विषयी सविस्तर माहिती – Cotton Information

 

कापसा पासून बनणाऱ्या वस्तू ह्या सर्व माणसांना वापरावे लागतात. जसे की कापड कापसापासून बनत असते. आज म्हणूनच आम्ही आपल्यासाठी कापसाची माहिती घेऊन आलेलो आहोत. कापूस या पिकाबद्दल सर्व माहिती आज आम्ही आपल्यासाठी देणार आहोत. आजकालच्या काळामध्ये प्रत्येकालाच कापसाची माहिती जाणून घेणे खूपच गरजेचे आहे तसेच महत्त्वपूर्ण देखील आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कापसाची माहिती.

कापसाचे माहिती मध्ये आपण कापसाचे प्रकार तसेच कापसाच्या विविध असणाऱ्या जाती त्याचप्रमाणे कापसावर कोणते औषधे फवारली जातात याची देखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

कापसासाठी लागणारे हवामान.

दोस्तांनो कापसासाठी हे कोरडे हवामान आवश्यक खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. कापूस हे पीक उगवणीसाठी 18 ते 22 सेल्सिअसपर्यंत तापमान हवे असते. 24 ते 30 सेल्सिअस पर्यंत कापसाचे पीक वाढीसाठी तापमान हे आवश्यक असते.
उष्ण दिवस व थंड रात्र हे तापमान कापसाचे बोंडे भरण्यासाठी खूपच महत्वपूर्ण आणि आवश्यक असते. अशाप्रकारे कापसासाठी हवामान आवश्यक असते.

पिकाच्या विविध जाती.

  1. कापूस या पिकासाठी सुधारित वाण बीटी हे आहे.
  2. कापसाची उशिरा लागवड करण्यासाठी डायना नांदेड हे देखील महत्त्वपूर्ण अशी कापसाची जात आहे.
  3. कापसाची हंगामी जात म्हणजे अजित 155.
  4. पूर्वहंगामी कापसाची जात ही jk 99 आहे.

खत व्यवस्थापन कसे करावे.

कापसासाठी पुढील प्रमाणे खत व्यवस्थापन करावे. कापूस लागवडीच्या टायमाला शंभर किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश हे संकरित वानांसाठी द्यावे. तसेच सुधारित वाणासाठी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश हे सुधारित वाणासाठी द्यावे.

जमिनीचा प्रकार कसा असावा.

कापसासाठी मध्यम खोल तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते.

रोग नियंत्रण कसे करावे.

कापूस या पिकावर मावा तुडतुडे पांढरी माशी इत्यादी हे सर्वप्रथम कापूस पिकाचे रस शोषण करत असतात.
कापूस या पिकांवरील रोग नियंत्रणासाठी आपण आपल्या जवळच्या कृषी तज्ञांचा सल्ला हा घ्यावा कृषी तज्ञांचा सल्ला मोफत असतो त्यामुळे आपण आपल्या जवळ असणाऱ्या कृषी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

तसेच तालुका वरील कृषी तज्ञांचा सल्ला देखील आपण यामुळे आपल्या कापूस पिकावरील नुकसान हे खूपच कमी होईल आणि आपल्याला कापूस पिकाचा चांगल्या प्रकारे फायदा देखील होईल.

पाणी व्यवस्थापन कसे करावे.

कापसाचे बियाणे लागवड करण्यापूर्वी जमिनीला पाणी देणे खूपच महत्वपूर्ण आवश्यक असते. तसेच पीक वाढत असताना पाणी देणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे पिकांची फुलोऱ्यात येत असताना पिकाला पाणी देणे खूपच आवश्‍यक असते. तसेच बोंडे भरण्यापूर्वी तसेच बोंडे भरल्यानंतर देखील कापूस या पिकाला पाणी द्यावे लागते.

पेरणी मधील असणारे अंतर.

आंतरपीक म्हणून आपण भुईमूग उडीद गवार यांसारखे पिके घेतल्यास आपल्याला खूपच महत्वपूर्ण असा फायदा होत असतो. तसेच आपल्याला कापूस या पिकांमधील आंतरपीक म्हणून तूर, सोयाबीन हे पिके घेतल्यास कापूस पिक देखील आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे फायद्यामध्ये पडत असते.

निष्कर्ष.

आपल्याला वरील भागामध्ये कापसाची माहिती अगदी सविस्तर येथे दिलेली आहे. आपल्याला कापसाची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच आपल्याला कापसाची माहिती याबद्दल आणखी कोणतीही माहिती हवी असल्यास आपण सर्वप्रथम आम्हाला कमेंट द्वारे कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

संदर्भ :- businesskar.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top