कृषी महाराष्ट्र

Cotton Rate : कापसाला यंदाही मिळतोय कमी दर, कापूस उत्पादकांची अडचण ! वाचा सविस्तर

Cotton Rate : कापसाला यंदाही मिळतोय कमी दर, कापूस उत्पादकांची अडचण ! वाचा सविस्तर

 

Cotton Rate : यंदा कापसाचे उत्पादन कमी होण्याच्या अंदाजानुसार कापसाला चांगला दर मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अद्याप तरी कापसाला कमीच दर आहे. सध्या कापसाला सात ते सात हजार तीनशे रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे दिसून येत आहे. सरकारी खरेदी सुरू नसल्याने खाजगी व्यापाऱ्याकडूनच कापूस खरेदी केला जात आहे.

नगर जिल्ह्यात या वर्षी पाऊस नसल्याने खरिपातच पेरण्यासह कापूस लागवडीला अडचणी निर्माण झाल्या. मात्र बहुतांश भागात कमी पावसावरच कापसाच्या लागवडी उरकल्या. शेवगाव, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहुरी, कर्जत भागांत कापसाचे क्षेत्र अधिक आहे. गेल्या वर्षी कापसाला सात ते नऊ हजारांपर्यंत दर मिळाला. दराची वाट पाहत शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला, मात्र शेवटपर्यंत दर मिळाला नसल्याने हिरमोड झाला.

यंदाही कापसाला कमीच दर आहे. नगर जिल्ह्यात शासनाने अजून सरकारी कापूस खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी सुरू आहे. सध्या ७ हजार २०० ते ७ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. यंदाही कापसाला चांगला दर मिळण्याची आशा आहे.

अजून फारसा कापूस विक्रीला येत नसला तरी खाजही व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केली आहे. यंदा मात्र दरवर्षीच्या तुलनेत कापसाच्या उत्पादनात मात्र पंचवीस ते चाळीस टक्के घट होण्याचा अंदाज आहे. Cotton Rate

सध्या कापसाची वेचणी सुरू आहे. पहिल्या व दुसऱ्या वेचनीला प्रति किलो १० रुपये द्यावे लागले. आता बऱ्याच भागांत तिसरी, चौथी वेचणी सुरू आहे. तिसऱ्या व चौथ्या वेचणीला पंधरा रुपये किलोपर्यंत मजुरी द्यावी लागत आहे. लागवड, खुरपणीची मजुरी आणि आता वेचनीची मजुरीही वाढली आहे.

वेचनीला मजूर मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. १२ ते १५ रुपयांपर्यंत किलोला दर देऊनही मजुरांच्या ने-आण करण्यासाठी लागणारा खर्चही शेतकऱ्यांनाच करावा लागत आहे. खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याने यंदाही कापसाचे पीक तोट्यातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कापूस चोरीचेही संकट

नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत कापसाची चोरी होण्याचे प्रकार सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कापूस चोरांनी एका शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. एक तर अत्यल्प पावसामुळे आधीच कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यातच शेतातील कापसाच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. हताश झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर शेतातील कापसाची राखण करण्याची वेळ आली आहे. Cotton Rate

कापूस बाजारभाव खालील प्रमाणे : 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/11/2023
सावनेरक्विंटल1200700070007000
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल10675070007000
मारेगावएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1094695072007050
उमरेडलोकलक्विंटल228710072107150
मनवतलोकलक्विंटल1220710074307350
वरोरालोकलक्विंटल1317710073507200
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल460717073107250
काटोललोकलक्विंटल205700072117150
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल200720072507240
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल3500700074357200
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल67690071007000
19/11/2023
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल608720072507230
वरोरालोकलक्विंटल448690073217000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल124700073007150
काटोललोकलक्विंटल20710071507100
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल150700071707085

Cotton Rate, आजचे कापसाचे भाव, आजचे बाजार भाव, आजचे बाजार भाव कापूस

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top