कृषी महाराष्ट्र

गव्हाच्या सुधारित जाती व संपूर्ण माहिती

गव्हाच्या सुधारित जाती व संपूर्ण माहिती

 

सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने गव्हाची पेरणी केली जाते. सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात सर्वाधिक गव्हाची शेती करत असतात. (Information about improved varieties of wheat)गव्हाच्या सुधारित जाती

माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

 

चांगली थंडी पडत असल्याने शेतकरी आता गव्हाची लागवड करत आहेत. यावर्षी गव्हाच्या शेतीतून बक्कळ कमाई करायची असेल तर शेतकरी बांधवांनी गव्हाच्या सुधारित जातींची पेरणी केली पाहिजे. यामुळे तुमचे उत्पन्न वाढणार आहे.

GW 273- गव्हाची ही एक सुधारित जात आहे. या जातीची देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. गव्हाचे GW 273 वाण सुमारे 115-125 दिवसांत उत्पादन देण्यास तयार होते. गव्हाचे GW 273 जातीची उत्पादन क्षमता 60 – 65 क्विंटल पर्यंत आहे.

पुसा तेजस ८७५९- गव्हाची ही एक उच्च उत्पादन देणारी जात आहे. जबलपूर कृषी विद्यापीठात एक हेक्टरमध्ये 70 क्विंटल पुसा तेजस गव्हाचे उत्पादन झाले होते, त्यानंतर या गव्हाच्या जातीबद्दल शेतकऱ्यांची आवड वाढली. गव्हाची ही जात साधारणतः ११०-११५ दिवसांत उत्पादन देण्यास तयार होते.

GW 322- गव्हाची ही एक सुधारित जात आहे. ही जात 115-120 दिवसांत उत्पादन देण्यासाठी तयार होते. गव्हाचे GW 322 जातीची उत्पादन क्षमता 60 – 62 क्विंटल पर्यंत आहे. GW 322 गव्हाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या जातीच्या गव्हाची भारतातील सर्व राज्यांमध्ये लागवड करता येते. गव्हाच्या सुधारित जाती

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top