कृषी महाराष्ट्र

Crop Insurance : सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात ८६ कोटी जमा ! वाचा सविस्तर

Crop Insurance : सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात ८६ कोटी जमा ! वाचा सविस्तर

 

Crop Insurance : या वर्षातील खरीप हंगामात पावसात खंड पडला होता. शिवाय यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसानही झाले. या नुकसानाची भरपाई म्हणून विमा कंपनीकडून २५ टक्के अग्रिम दिल्या जात आहे. आतापर्यंत एक लाख ५६ हजार ५४६ शेतकऱ्यांच्या खात्यात ८६ कोटी १८ लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. Crop Insurance

सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे जिल्हास्तरीय संयुक्त समितीने सप्टेंबरमध्ये पीकविमा कंपनीला २५ टक्के अग्रिम भरपाई देण्याचे निर्देश काढले होते. पीकविमा कंपनीने याला प्रतिसाद देत शासनाच्या अधिसूचनेनुसार ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे सुरू केले.

सोयाबीन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत सर्व महसूल मंडलांतील दोन लाख ११ हजार ९६८ शेतकऱ्यांना २ लाख १६ हजार २३२ हेक्टर क्षेत्रासाठी अंदाजे १२२ कोटी रुपये नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविमा कंपनीकडून जमा होणे अपेक्षित आहे.

आतापर्यंत दोन लाख ११ हजार ९६८ शेतकऱ्यांपैकी एक लाख ५६ हजार ५४६ शेतकऱ्यांच्या खात्यात ८६ कोटी १८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे उत्पादन कमालीचे घटले होते.

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकुल (mid season Adversity) २५ टक्के विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अदा करण्याची अधिसूचना ६ सप्टेंबर रोजी लागू केली. यानुसार एचडीएफसी ॲग्रो कंपनीने भरपाई देण्यास सुरुवात केली आहे.

तालुकानिहाय पात्र शेतकरी संख्या

तालुका संख्या

अकोला ३३७३१ Crop Insurance

बार्शीटाकळी २४३६६

मूर्तीजापूर २३४७६

अकोट १५११०

तेल्हारा १७४५०

बाळापूर २५४९०

पातूर १६९२३

एकूण १५६५४६

जमा रक्कम ८६ कोटी १८ लाख ५४ हजार १९२ रुपये

Crop Insurance

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top