कृषी महाराष्ट्र

Onion Seeds : कांदा बियाण्याचे दर स्थिरावले ! वाचा सविस्तर

Onion Seeds : कांदा बियाण्याचे दर स्थिरावले ! वाचा सविस्तर

 

Onion Seeds : खानदेशात रब्बीतील कांदा लागवडीची तयारी शेतकरी करीत आहेत. त्यासाठी कांदा रोपवाटिका तयार केल्या जात असून, कांदा बियाण्याचे दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे.

काही शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्येच रोपवाटिकांत बियाणे टाकले. तर काही शेतकरी अद्यापही रोपवाटिका तयार करीत आहेत. मध्यंतरी बियाणे अधिक दरात शेतकऱ्यांना घ्यावे लागेल, अशी स्थिती होती.

परंतु शेतकऱ्यांच्या बियाण्याचे दर मागील काही दिवसांत सतत कमी झाले आहेत. ग्रामीण भागात अनेक शेतकरी दर्जेदार बियाण्याची विक्री करीत आहेत. बियाणे उगवणीशिवाय पैसे देवू नका, अशी हमी घेऊनही काही शेतकरी बियाणे विक्री करीत आहेत. Onion Seeds

धुळ्यात शिंदखेडा, शिरपूर, जळगाव जिल्ह्यात जळगाव, एरंडोल, धरणगाव, रावेर, चोपडा आदी भागात अनेक कांदा बियाणे विक्रेते शेतकरी आहेत. ३०० ते ४०० आणि ५०० रुपये प्रतिकिलोने ही विक्री सुरू आहे.

यंदा रोपवाटिकांची संख्याही कमी आहे. अनेक शेतकरी कांदा पिकाकडे वळणार नाहीत, असे सांगितले जात होते. कारण पाऊसमान कमी आहे. ज्या वेळी कांदा शेतकऱ्यांकडे असतो, तेव्हा दर कमी असतात, असाही अनुभव मागील काही महिने राहिला आहे.

यात बियाण्याची उगवण व्यवस्थित होईल की नाही, अशी भीतीही होती. परंतु शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन करून रोपवाटिकांमध्ये बियाण्याची उगवणक्षमता टिकविली. काहींची रोपे चांगली वाढत आहेत. Onion Seeds

कांदा लागवड धुळे जिल्ह्यात अधिक होईल. साक्री, शिंदखेडा भागात ही लागवड अधिक असेल. तर जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा आदी भागात लागवड होईल, अशी स्थिती आहे. लागवडीस डिसेंबरमध्ये सुरवात होईल. ही लागवड जानेवारीतही सुरू राहील, असे दिसत आहे.

Onion Seeds

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top