कृषी महाराष्ट्र

Cotton Market Update | आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर वाढले !

Cotton Market Update | आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर वाढले !

Cotton Market Update

Cotton Bajarbhav : देशातील बाजारात कापसाचे दर दबावात आहेत. सध्या कापसाला चालू हंगामातील निचांकी भाव मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांमध्ये सुधारणा झाली. तसेच प्रत्यक्ष खरेदीचे सरासरी दर म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्सही वाढला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाच्या वाद्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील चार दिवसांपासून कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा होत गेली. अमेरिकेच्या मध्यवर्ती बॅकेने अर्थात फेडरल रिझर्व्हने यापुढे व्याजदारत वाढ होणार नसल्याचे संकेत दिले.

तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याने कापूस वायद्यांमध्ये सुधारणा दिसत असल्याचे जाणकारांनी सांगितले. वायद्यांमध्ये मागील चार दिवसांमध्ये जवळपास ८ टक्क्यांची सुधारणा झाली. Cotton Market Rate

कापूस वायद्यांनी आज दुपारपर्यंत ८६.९० सेंट प्रतिपाऊंडचा टप्प गाठला होता. कापूस वायद्यांनी २७ जानेवारी २०२३ नंतर हा टप्पा गाठला होता. म्हणजेच तब्बल पाच महिन्यानंतर कापूस वायद्यांनी हा टप्पा गाठला.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढत आहे. चीनमधूनही आयात सौदे वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे सुधारत असल्याचे जाणकारांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमधील सुधारणेबरोबरच प्रत्यक्ष कापूस खरेदी दरही वाढले.

जागतिक प्रत्यक्ष कापूस दराची सरासरी म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्सही वाढला. काॅटलूक ए इंडेक्स ९८ सेंट प्रतिपाऊंडवर होता. काॅटलूक ए इंडेक्सही अनेक दिवसानंतर या पातळीवर पोचला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आणि काॅटलूक ए इंडेक्समध्ये सुधारणा झाल्याचा परिणाम देशातील बाजारावर मात्र जाणवला नाही. देशातील कापूस बाजारावर मागील आठवड्यापासून दबाव वाढला.

कापसाच्या दराने आता हंगामातील निचांकी पातळी गाठली. सध्या देशात कापसाला सरासरी ७ हजार २०० ते ८ हजार रुपयांंचा भाव मिळत आहे. मे महिन्यात हंगामातील निचांकी भाव मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बाजार विश्लेषक सांगत आहेत. Cotton Market

देशातील बाजारात सध्या कापसाची आवक सरासरी ८० हजार गाठींच्या दरम्यान असल्याचे व्यापारी सांगत आहेत. चालू हंगामात मे महिन्यातील आवक विक्रमी पातळीवर होत आहे. त्यामुळे कापसाच्या दरावर दबाव आहे.

बाजारातील कापूस आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दरवाढीचाही आधार देशातील कापूस बाजाराला मिळेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. Cotton Market Update Cotton Market Update

source: agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top