कृषी महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतापेक्षा कापूस महाग ? कारण काय ? वाचा सविस्तर

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतापेक्षा कापूस महाग ? कारण काय ? वाचा सविस्तर

कापूस महाग

Cotton Market : देशातील बाजारात मागील आठवड्यापासून नरमाई वाढत गेली. अनेक बाजारात कापूस दराने आता ७ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला. तर काही ठिकाणी कपासाला सरासरी ७ हजार रुपयांचाही भाव मिळत आहे.

देशात कापसाचे भाव दबावात असताना आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सुधारणा झाली. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे भाव देशातील भावापेक्षा अधिक आहेत.

खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी कापसाची विक्री करत आहेत. पण सध्या बाजारात कापसाला हंगामातील सर्वात कमी भाव मिळत आहे. अनेक बाजारात कापसाने ७ हजार रुपयांचा टप्पा गाठला.

हा भाव चालू हंगामातील आतापर्यंतचा सर्वात कमी भाव आहे. विशेष म्हणजे हा भाव मे महिन्यात मिळतो आणि तोही हंगामातील सर्वात निचांकी. ही परिस्थिती कापूस उत्पादकांचा हीरमोड करणारी आहे. कारण शेतकऱ्यांनी यंदा मे महिन्यांपर्यंत कापूस मागे ठेवला होता.

मागील हंगामात कापसाला मे महिन्यात १० हजारांचा भाव मिळत होता. यंदाही हा भाव हाती लागेल, असे शेतकऱ्यांना वाटत असताना प्रत्यक्ष मात्र हंगामातील सर्वात कमी भाव मिळत आहे.

कापसाचे भाव कमी होण्यासाठी उद्योगांकडून कापडाला कमी मागणी असल्याचे कारण दिले जात आहे. पण जाणकारांच्या मते देशातील कापूस उत्पादनात यंदा मोठी घट झाली. देशाची गरज भागवेल, ऐवढेच उत्पादन आहे.

यामुळे कापसाचे भाव एवढे कमी होण्याचे कारण नाही. पण शेतकरी मागील दोन महिन्यांपासून कापसाचे पॅनिक सेलिंग करत आहेत. पण कापसाला किमान ८ हजारांचा भाव टिकून असायला हवा होता.

मात्र शेतकऱ्यांना पावसाच्या आधी कापूस विकावाच लागेल, हे उद्योगांना माहीत आहे. या काळात कोणत्याही भावाला शेतकरी कापूस देतील, याचीही कल्पाना सर्वांना आहे. त्यामुळेच कापसाचे भाव कमी करण्यात आले, असे जाणकारांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कापूस दरात मागील आठवडाभरात चांगली सुधारणा झाली. कापसाचे वायदे ८७ सेंट प्रतिपाऊंडवर होते. मागील आठवड्यात कापसाला सरासरी ८१ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान भाव मिळत होता.

आतापर्यंत उद्योगांकडून देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा अधिक असल्याची ओरड सुरु होती. पण आता ही परिस्थिती राहीली नाही. वायद्यांमधील दराचा विचार करता देशात खंडीला ५९ हजार ५०० रुपये म्हणजेच क्विंटलला १६ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे.

कापसाचे म्हणजेच आठवडाभरात कापसाचे वायदे ६ सेंटने सुधारले. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रत्यक्ष खरेदीचे दर म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्सही ९७ सेंट प्रतिपाऊंडवर पोचला. काॅटलूकमध्येही ५ सेंटची सुधारणा पाहायला मिळाली.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात क्विंटलमधील दर १५ हजार ९०० रुपये होतो. म्हणजेच सध्याचा फरक केवळ १ हजार रुपयांचा आहे. वाहतूक आणि इतर खर्च पकडल्यास आयात कापूस महागच पडतो. प्रत्यक्ष खेरदीत कापूस गाठींचे भाव ५७ हजार ५०० रुपये म्हणजेच १६ हजार १५० रुपये प्रतिक्विंटल आहेत. Cotton Market

मागील काही दिवसांपासून दैनंदीन आवक कमीच होत आहे. पण शेतकऱ्यांच्या हतबलतेचा फायदा घेण्याचे काम सुरु आहे. गरज असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकदा कापूस विकला आणि आवकेचा दबाव कमी झाला की दरात पुन्हा सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तर जागतिक बाजारातील प्रत्यक्ष कापूस खरेदीची सरासरी १७ हजार ६८० रुपये आहे. म्हणजेच देशातील शेतकऱ्यांना क्विंटलमागं जवळपास १ हजार ५०० रुपये कमी भाव मिळत आहे.

शेतकरी कापूस विकत असल्याने सध्या भाव दबावात आहेत. पण कापसाची बाजारातील आवकेची गती कायम राहणार नाही. कापूस आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याचा अंदाज आहे.

कापूस भाव आजचा महाराष्ट्र, kapus bajar bhav today, kapus bhav today

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top