कृषी महाराष्ट्र

Cotton Varieties : बाजारपेठेत कपाशीच्या विशिष्ट वाणांची मागणी ! वाचा सविस्तर

Cotton Varieties : बाजारपेठेत कपाशीच्या विशिष्ट वाणांची मागणी ! वाचा सविस्तर

Cotton Varieties

Akola News : आगामी पावसाची शक्यता पाहून शेतकरी बी-बियाणे, खतांची तजवीज करून ठेवत आहेत. बाजारात कपाशीच्या काही विशिष्ट वाणांची मागणी वाढलेली असल्याचा फायदा काही विक्रेतेसुद्धा घेत आहेत. याच मुद्यावर शिवसेनेने जिल्हा अधीक्षकांच्या कक्षात बुधवारी (ता.२१) ठिय्या आंदोलनसुद्धा केले होते.

जिल्ह्यात एका कंपनीच्या विशिष्ट कपाशी वाणांची मागणी वाढलेली आहे. शेतकरी हे वाण शोधण्यासाठी विक्रेत्यांच्या पायऱ्या झिजवत आहेत. काही विक्रेत्यांकडे असलेल्या नोंदीपेक्षा त्यांनी शेकडो पाकिटे जास्तीची विक्री केली आहे. Cotton Varieties

शेजारच्या जिल्ह्यांमधून हे वाण आणत शेतकऱ्यांना जादा दराने तसेच सोबत दुसऱ्या बियाण्यांचे पाकीट घेण्याचा आग्रह धरत आहेत. हा व्यवहार कागदोपत्री होत नसल्याने यंत्रणांना कुठलीही कारवाई करणे शक्य राहलेले नाही.

शिवसेनेने केलेल्या आंदोलनादरम्यान त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बियाणे विक्री करण्याची मागणीसुद्धा लावून धरली होती. अशा प्रकारची उपाययोजना केली गेली तर शेतकऱ्यांची लूट थांबू शकेल. Cotton Market

जूनमध्ये पेरणी झाल्यास वेगळे वाण आणि जुलैत उशिरापर्यंत पेरणी करावी लागल्यास वेगळे वाण वापरण्याची शक्यता पाहता विक्रेते संबंधित कंपनीचे बियाणे देताना अडवणूक करीत आहेत, मात्र कारवाई केलेली दिसून आलेली नाही.

कृषी विभागाकडे तक्रारीच नाहीत

एकीकडे महाग दराने विशिष्ट बियाणे विक्री केले जात आहे. काही ठिकाणी लिंकिंगचाही प्रकार केला जात आहे. मात्र, याबाबत कृषी विभागाकडे कुठेही तक्रारी नसल्याने कारवाई करण्यात अडचणी असल्याचे सूत्राने सांगितले. अशा विक्रेत्यांची माहिती कृषी विभागाला दिल्यास कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top